रेल्वे स्थानकात अनोळखी व्यक्तींचा आढळला मृतदेह
By Admin | Updated: August 10, 2014 00:10 IST2014-08-09T23:38:32+5:302014-08-10T00:10:07+5:30
परभणी : येथील रेल्वे स्थानकावर ९ आॅगस्ट रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला़

रेल्वे स्थानकात अनोळखी व्यक्तींचा आढळला मृतदेह
परभणी : येथील रेल्वे स्थानकावर ९ आॅगस्ट रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला़ रेल्वे स्थानकावरील मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ असलेल्या एटीएम केंद्राजवळ हा मृतदेह आढळला़
मयत व्यक्तीचा नैसर्गीक मृत्यू झाला असून, त्याचे वय अंदाजे ५० वर्षे असावे़ सडपातळ बांध्याचा, पाच फुट उंचीचा हा व्यक्ती सावळ्या रंगाचा असून, त्याचा चेहरा गोल आहे़, नाक सरळ आहे़, लांब बाह्याचे पांढरे शर्ट त्याने परिधान केले असून, अशा वर्णनाच्या व्यक्तीची कोणाला माहिती असल्यास त्यांनी रेल्वे पोलिस चौकशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे़ या प्रकरणाचा तपास पोहेकाँ शरद डावरे व पोकाँ राम कातकडे करीत आहेत़
रेल्वे स्थानक परिसरातच ८ आॅगस्ट रोजी प्लॅट फॉर्म क्रमांक २ वर आलेल्या पूर्णा- परळी या पॅसेंजर गाडीच्या डब्यामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला़ ३५ वर्षे वयाचा हा व्यक्ती असून दीर्घ आजाराने त्याचा मृत्यू झाला असावा़ सडपातळ बांध्याचा हा व्यक्ती असून, रंगाने गोरा आहे़ चेहरा लांबट असून, लाल रंगाचे फुल शर्ट व विटकरी रंगाची पँट त्याने परिधान केलेली आहे़ ओळख पटविण्यासाठी हा मृतदेह परभणी येथील शीतगृहात ठेवण्यात आल्याचे पोहोकाँ शरद डावरे व राम कातकडे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)