‘त्या’ अनोळखी मृतदेहाची पटली ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2016 23:20 IST2016-05-31T23:17:16+5:302016-05-31T23:20:47+5:30
लातूर : जिल्हा परिषदेच्या पाठीमागील जागेत एका ४३ वर्षीय पुरुषावर चौघांनी बलात्कार करुन खून केल्याची घटना १३ एप्रिलच्या मध्यरात्री १.३० वाजता घडली होती.

‘त्या’ अनोळखी मृतदेहाची पटली ओळख
लातूर : जिल्हा परिषदेच्या पाठीमागील जागेत एका ४३ वर्षीय पुरुषावर चौघांनी बलात्कार करुन खून केल्याची घटना १३ एप्रिलच्या मध्यरात्री १.३० वाजता घडली होती. या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना अपयश आल्यानंतर, एका सेवाभावी संस्थेकडून अंत्यसंस्कारही करण्यात आले. मात्र, एका वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या गुन्हेकथेतील छायाचित्रावरुन पत्नी रेखा मोरे (३५) यांनी हे छायाचित्र आपले पती कृष्णा विठ्ठल मोरे यांचेच असल्याचा दावा केला असून, तब्बल ४८ दिवसानंतर ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली आहे.
औसा तालुक्यातील हसलगण येथील मुळचा असलेला कृष्णा विठ्ठल मोरे हा गेल्या काही दिवसापासून पाखरसांगवी शिवारातील स्वराजनगरात दोन मुले, एक मुलीसह वास्तव्य करत होता. कृष्णा मिळेल ते काम करुन आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवित होता. कामानिमित्त तो शेजारील जिल्ह्यातही वेळप्रसंगी जात होता. तो अधूनमधून मद्य प्राशनही करायचा... १३ एप्रिलरोजी तो घरातून कामाला जातोय असे म्हणून बाहेर पडला. तेंव्हापासून तो घरी परतलाच नाही. चार-आठ दिवस पत्नी रेखाने वाट पाहिली आणि पाहुण्यांकडे पतिचा शोध घेतला मात्र ते आढळून आले नव्हते़ (प्रतिनिधी)