शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानपुरा ठाण्यात साफसफाईचे काम करणारा कुख्यात कल्ल्या घरफोडीच्या गुन्ह्यात अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 22:45 IST

गुन्हेगारी सोडल्याचे सांगत वर्षभरापासून उस्मानपुरा ठाण्यात साफसफाईचे काम करणारा कुख्यात कल्ल्या ऊर्फ कलीम खान शब्बीर खान (३२, रा. छोटा मुरलीधरनगर) याला सातारा परिसरात वर्षभरापूर्वी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात तांत्रिक पुराव्याच्या आधारे गुन्हे शाखेने अटक केली.

औरंगाबाद : गुन्हेगारी सोडल्याचे सांगत वर्षभरापासून उस्मानपुरा ठाण्यात साफसफाईचे काम करणारा कुख्यात कल्ल्या ऊर्फ कलीम खान शब्बीर खान (३२, रा. छोटा मुरलीधरनगर) याला सातारा परिसरात वर्षभरापूर्वी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात तांत्रिक पुराव्याच्या आधारे गुन्हे शाखेने अटक केली.सातारा परिसरातील देवडानगर येथील रहिवासी संतुक कवठेकर यांचे घर चोरट्यांनी १३ मे रोजी फोडले होते. या घटनेत सोन्याचे गंठण, कर्णफुले, अंगठी आणि रोख रकमेसह ७० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. याविषयी सातारा ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. या घटनेनंतर ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. शिवाय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली होती. ठसे तज्ज्ञांनी नुकताच याबाबतचा अहवाल गुन्हे शाखेला दिला. या अहवालानुसार घटनास्थळावरील बोटाच्या ठशांचे नमुने आणि कल्ल्याच्या हाताच्या ठशाचे नमुने एकच असल्याचे निष्पन्न झाले. याआधारे गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नंदकुमार भंडारे, कर्मचारी लालखॉ पठाण, बापूराव बावस्कर, नंदू चव्हाण, योगेश गुप्ता आणि चालक दादासाहेब झारगड यांच्या पथकाने कल्ल्या ऊर्फ कलीम खानला शुक्रवारी रात्री त्याच्या घरातून उचलले. त्याला पुढील कारवाईसाठी सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले.अकरा महिने होता कारागृहातवाटमारी आणि घरफोडीच्या गुन्ह्याचे शतक केलेला कल्ल्या ऊर्फ कलीम खान हा पोलिसांना चकमा देण्यात पटाईत. दोन वर्षांपूर्वी उस्मानपुरा पोलिसांनी मोठ्या शिताफीने कल्ल्याला परभणी रेल्वेस्टेशन परिसरातून पकडून आणले होते. पोलीस कोठडीदरम्यान त्याने एक डझनभर गुन्ह्याची कबुली देत चोरलेला ऐवज पोलिसांना काढून दिला होता. तेव्हापासून तो ११ महिने कारागृहात होता. जामिनावर सुटल्यानंतर कल्ल्याने सातारा परिसरात कवठेकर यांचे घर फोडले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला रोज उस्मानपुरा ठाण्यात हजेरी देणे बंधनकारक होते. त्यामुळे तो रोज उस्मानपुरा ठाण्यात हजेरी लावण्यासाठी येई. तेव्हा तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक कल्याण शेळके यांनी त्याचे समुपदेशन करून गुन्हेगारी सोडण्यास प्रवृत्त केले. तेव्हापासून तो पोलीस ठाण्याची सफाई करण्याचे काम करतो. दरम्यान, जुन्या गुन्ह्यात त्याला शुक्रवारी अटकेला सामोरे जावे लागले.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी