शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघात महायुतीचा अनपेक्षित उमेदवार!

By बापू सोळुंके | Published: February 24, 2024 7:27 PM

Neelam Gorhe : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी उपसभापती नीलम गोऱ्हे येथे आल्या होत्या.

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघावर भाजपकडून तयारी सुरू आहे. असे असले तरी या मतदार संघातून अनपेक्षित उमेदवार असू शकतो, असा गौप्यस्फोट शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी येथे शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. यापूर्वी त्या उमेदवारांसोबत आपण काम केलेले असू शकते, असेही त्यांनी नमूद केले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी उपसभापती नीलम गोऱ्हे येथे आल्या होत्या. सुभेदारी विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांसोबत त्यांनी आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

गोऱ्हे म्हणाल्या की, जिल्ह्यातील सोयगाव आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. तर उर्वरित तालुक्यातही दुष्काळसदृश परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने एक जी.आर.काढला आहे. या जी.आर.नुसार जूनपर्यंत बँकांनी कर्जवसुली थांबवावी, वीज कनेक्शन तोडू नये आणि विद्यापीठ, शाळांनी विद्यार्थ्यांकडून फीस वसुली करू नये, असे निर्देश आहेत. असे असताना विद्यापीठाने फीस वसुलीसाठी तगादा लावल्याचे समजल्याने शासनाच्या जी.आर.ची अशा प्रकारे अंमलबजावणी विद्यापीठ करीत आहे का, असा सवाल करीत याविषयी राज्यपालांना पत्र देणार असल्याचे त्या म्हणाल्या. मराठवाड्यातील उसतोड कामगार मार्चपासून आपल्या गावी परतण्यास सुरुवात होते. त्यांच्यावर बेरोजगाराची वेळ येऊ नये, यासाठी रोजगार हमी योजनेची कामे तयार ठेवण्याची सूचना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना केली असता त्यांनी ६५ हजार रोहयो कामे तयार असल्याचे सांगितले.

शरद पवार यांच्या पक्षाला बरे चिन्ह मिळालेशरद पवार यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने दिलेल्या तुतारी निवडणूक चिन्हाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. याबाबत गोऱ्हे म्हणाल्या की, शरद पवार यांच्या पक्षाला बरे चिन्ह मिळाले आहे. कारण मी रिपाइंमध्ये काम केलेले आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी वेगवेगळे चिन्ह मिळत होते. यापेक्षा तुतारी बरी.

निर्दोष कायदा केला, नकारात्मकतेने पाहू नयेमराठा समाजाचे यापूर्वीचे दोन कायदे टिकले नाहीत. आता नुकताच एकमताने संमत झालेला नवा कायदा निर्देाष केला आहे. याकडे मराठा समाजाने नकारात्मकतेने पाहू नये, असे आपल्याला वाटत असल्याचे उपसभापती म्हणाल्या. 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हे