शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
2
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
3
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
4
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
5
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
6
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
7
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
8
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
9
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
10
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
11
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
12
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
13
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
14
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
15
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
16
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
17
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
18
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
19
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
20
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!

डमी वेबसाइटद्वारे बेरोजगार लक्ष्य; सायबर सेलकडे तक्रारीत मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 12:45 IST

वेबसाइटच्या प्रलोभनास बळी पडून आर्थिक फसवणूक

ठळक मुद्देनोकरीच्या नावाने फसवणूक सावधगिरीने राहण्याचा सल्ला

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेले लॉकडाऊन रोजगाराच्या जिवावर उठले आहे. अनेक रोजगारक्षम उद्योग व्यवसायांची दैना झाली असून कॉस्टकटिंगमुळे बेरोजगारी वाढू लागली आहे. तर नवीन उद्योग गुंतवणुकीस पुढे येत नसल्यामुळे छुपी बेरोजगारी वाढते आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बेरोजगारांना ऑनलाइन गंडविणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.

कोरोनामुळे दीड वर्षांपासून बहुतांश व्यवहार ऑनलाइन होत असल्यामुळे दैनंदिनीची सुरुवातच मोबाइल, लॅपटॉप, आयपॅड हाताळण्यापासून होत आहे. कामासोबत इंटरनेट सर्फिंग करताना डमी वेबसाइटवर अनेकांची नजर जाते, काहीजण दुर्लक्ष करतात, तर काही त्या वेबसाइटच्या प्रलोभनास बळी पडून आर्थिक फसवणूक करून घेतात.

कोरोनाच्या काळात वर्कफ्रॉम होमचा ट्रेंडकोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभर बहुतांश उद्योग-व्यवसायात वर्कफ्रॉर्म होमचा ट्रेंड आला. याच काळात अनेक कंपन्यांनी, संस्थांच्या डमी जाहिरात सोशल मीडियातून येण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑनलाइन केवायसी भरून देण्यात त्रुटी असल्याचे सांगून बेरोजगारांना गंडविण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

ऑनलाइन ऑफरची अशी करा खातरजमाऑनलाइन नोकरीची ऑफर आल्यास कामाचे स्वरूप काय आहे. किती काम करावे लागेल. याबाबत स्पष्टता तपासा. कंपनीची पूर्ण माहिती संकलित करा. त्यातील अटी व शर्ती पूर्णपणे वाचून घ्या. केवायसीच्या नावाने डॉक्युमेंट घेत असताना काळजीपूर्वक माहिती घ्या. करार करण्यापूर्वी ऑनलाइन ऐवजी समक्षपणे भेटूनच चर्चा करा.१ संकेतस्थळाची इंटरनेटवरून जास्तीत जास्त माहिती मिळवा.२ ज्या लिंक्स कधीही पाहण्यात आल्या नाहीत, त्यावर क्लिक करू नका.३ अँटिव्हायरसद्वारे धोकादायक आणि डमी लिंक्स ब्लॉक करा.

अशी होऊ शकते फसवणूक.१) ऑनलाइन जॉब ऑफर म्हणजे सायबर फसवणुकीचा हा प्रकार असू शकतो. यामध्ये डाटा एन्ट्री किंवा टायपिंगचे काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखविले जाते. अशा ऑफर देणाऱ्या कंपन्यांची जाहिराती फेक असू शकतात.२) सुरुवातीला काही कामाचे पैसे दिले जातात. मात्र नंतर कामात चुका झाल्या, त्यामुळे काम रिजेक्ट झाले आहे. तसेच कंपनीचे नुकसान झाले आहे. गुन्हा दाखल करण्याची भीती घालून पैसे उकळले जातात. यात अनेक बेरोजगार फसतात.

दोन तक्रारी झाल्या आहेत दाखलऑनलाइन जॉब देण्याच्या जाहिरातींमधील अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचव्यात. सायबर सेलकडे फसवणुकीच्या दोन तक्रारी सध्या दाखल असून, मागील वर्षभरात अशा फसवणुकीचा ट्रेंड आला आहे. ऑनलाइन केवायसी अर्ज केल्यानंतर त्यात त्रुटी दाखवून बेरोजगारांना संस्थांकडून ब्लॅकमेल केले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे अशा जाहिरातींची खातरजमा करणे गरजेचे आहे.- गीता बागवडे, पोलीस निरीक्षक सायबर सेल, पोलीस आयुक्तालय

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमAurangabadऔरंगाबाद