महिला समृद्धी योजनेंतर्गत २२० महिलांना सव्वा कोटी कर्ज वाटप
By Admin | Updated: July 3, 2014 00:16 IST2014-07-02T23:17:34+5:302014-07-03T00:16:14+5:30
अंबाजोगाई: साठे विकास महामंडळाकडून केज मतदार संघातील मातंग समाजाच्या महिलांसाठी महिला समृद्धी योजनअंतर्गत २२० महिलांना कर्ज वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

महिला समृद्धी योजनेंतर्गत २२० महिलांना सव्वा कोटी कर्ज वाटप
अंबाजोगाई: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून केज मतदार संघातील मातंग समाजाच्या महिलांसाठी महिला समृद्धी योजनअंतर्गत २२० महिलांना कर्ज वितरणाचा कार्यक्रम महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांच्या हस्ते पार पडला.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून मातंग समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ घेऊन मातंग समाजाने आपली आर्थिक प्रगती साधावी. मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महामंडळाकडून निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी दिली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक द्वारकादास लोहिया होते. तर व्यासपीठावर आ. पृथ्वीराज साठे, अॅड. मेघराज आडसकर, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, विलास सोनवणे, मदन यादव, अमर देशमुख, तारामती उबाळे, नेताजी शिंदे, कमलाकर चौसाळकर, अॅड. राजेश्वर चव्हाण, राजेभाऊ औताडे, किशोर परदेशी, गिरीधारीलाल भराडिया, बबन लोमटे, मधुकर काचगुंडे, तहसीलदार राहुल पाटील उपस्थित होते. महिलांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी महामंडळाचा ५० टक्के निधी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. महामंडळ मातंग समाजाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असून महिलांना लघु उद्योग उभारणीसाठी महामंडळाच्या प्रयत्नातून केंद्र सरकारकडूनही १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेण्यात आला आहे. यातून ६८ कोटी रुपये महिलांना लघु उद्योग उभारण्यासाठी देण्यात आले आहेत.
आ. पृथ्वीराज साठे यांचे भाषण झाले. अध्यक्षीय समारोप डॉ. लोहिया यांनी केला. यावेळी बेटी बचाव अभियानचे धिमंत राष्ट्रपाल यांना मोटारसायकल भेट दिली. (वार्ताहर)