‘जलयुक्त’ अंतर्गत खोलीकरणाची कामे थंडावली
By Admin | Updated: February 4, 2016 00:35 IST2016-02-04T00:33:15+5:302016-02-04T00:35:38+5:30
कळंब : ग्रामीण भागात एका चळवळीत परावर्तीत झालेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक नदी, नाल्यांनी मोकळा श्वास घेतल्याने पाणी साठवण क्षमता वाढली.

‘जलयुक्त’ अंतर्गत खोलीकरणाची कामे थंडावली
कळंब : ग्रामीण भागात एका चळवळीत परावर्तीत झालेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक नदी, नाल्यांनी मोकळा श्वास घेतल्याने पाणी साठवण क्षमता वाढली. परंतु, सद्यस्थितीत तालुक्यात केवळ पुनर्भरण आणि शेततळ्याची कामे सुरू असून, खोलीकरणासारखे एकही मोठे काम सुरू नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच्या चार महिन्यात ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. परंतु जवळपास एक लाख हेक्टरच्या आसपास लागवडीखाली असलेल्या क्षेत्राला शाश्वत पाणी उपलब्ध नसल्याने शेतीची संपूर्ण मदार पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे कमी पर्जन्यमानाच्या कालावधीत शेती व्यवसायावर मोठे संकट ओढवते. याच पार्श्वभूमीवर शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवारात अभियानांतर्गत निवड झालेल्या ५७ पैकी बहुतांश गावात विविध प्रकारची १७२ कामे करण्यात आली. यामधून शेकडो मिटर लांबीच्या नदी, नाल्यांचे खोलीकरण झाले. परंतु, सध्या याकामांना मरगळ आल्याचे चित्र आहे. सध्या मग्रारोहयो मधून विहीर पुनर्भरण व शेततळ्याची कामे सुरू असली तरी शासकीय स्तरावर एकही खोलीकरणाचे काम सुरू नाही.