भविष्य सांगण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने केली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:04 IST2021-07-24T04:04:46+5:302021-07-24T04:04:46+5:30

औरंगाबाद : भविष्य सांगण्याच्या बहाण्याने आलेल्या भोंदू बाबाने एका महिलेच्या घरात प्रवेश करीत एका वस्तूचा वास घेण्यास लावून ...

Under the pretext of divination, the false father committed theft | भविष्य सांगण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने केली चोरी

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने केली चोरी

औरंगाबाद : भविष्य सांगण्याच्या बहाण्याने आलेल्या भोंदू बाबाने एका महिलेच्या घरात प्रवेश करीत एका वस्तूचा वास घेण्यास लावून गुंगी आल्यानंतर ३२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घडली. अज्ञात भोंदू बाबावर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांनी दिली.

मुकुंदवाडी येथील जे सेक्टर ज्ञानेश्वर कॉलनी येथील एका घरी ४५ वर्षांची व्यक्ती भविष्य सांगण्यासाठी आली. या व्यक्तीने कुंकवासारखा काहीतरी पदार्थ टाकला व तुम्ही वास घेऊन दर्शन घ्या, असे सांगितले. संबंधित महिलेने वास घेतला असता, त्यांना डोके सुन्न होऊन गुंगी आली. तेव्हा भोंदू बाबाने डाव साधला. त्यांच्या हातात असलेल्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या. या दोन अंगठ्यांची किंमत ही ३२ हजार रुपये एवढी होती. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेच्या भाच्चीने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यातील विशेष पथक आरोपीचा शोध घेत आहे.

Web Title: Under the pretext of divination, the false father committed theft