भोकर तालुकादुष्काळाच्या सावटाखाली

By Admin | Updated: August 13, 2014 00:45 IST2014-08-13T00:31:42+5:302014-08-13T00:45:26+5:30

भोकर: दुबार व तिबार पेरणी करुनही पावसाने लंडीचा डाव चालूच ठेवला असल्याने भोकर तालुक्यातील पिके आता कोमजू लागली आहेत.

Under the bosom of Bhokar taluka day | भोकर तालुकादुष्काळाच्या सावटाखाली

भोकर तालुकादुष्काळाच्या सावटाखाली

भोकर: दुबार व तिबार पेरणी करुनही पावसाने लंडीचा डाव चालूच ठेवला असल्याने भोकर तालुक्यातील पिके आता कोमजू लागली आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून तालुक्यावर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे.
भोकर तालुक्यात यावर्षी अद्याप पर्यंत दमदार पाऊस झाला नाही. कधी मधी पडणाऱ्या हलक्या पावसाने शेतकरी कुठे दुबार तर कुठे तिबार पेरणी केली. पण मागील आठवड्यापासून पावसाने पुन्हा दांडी मारली आहे. हलकासा पाऊस ही न झाल्याने पिके आता कोमजू लागले आहेत. आधीच महागडे बियाणे, खत क्षेत्रात टाकलेले शेतकरी आता हवालदिल झाला आहे. पाऊस पडावा म्हणून पूजा आर्चा, भंडारेही झाले पण याचा उपयोग मात्र होवू शकला नाही.
करोडो रुपयांचे बियाणे व खत शेतात टाकून बसलेल्या शेतकऱ्यांना खरी गरज आहे ती पावसाची पण पावसाचा रुसवा कायम आहे. एकीकडे पिके कोमजू लागले असून चाऱ्याचा प्रश्नही मौन झाला आहे. जनावरांना ना चारा मिळतोय ना पियाला पाणी. यामुळे तालुक्यात चारा छावण्या उभारणे आता गरजेचे आहे.
मागील काही दिवसांपासून कोरडा दुष्काळ जाहीर करावा यासाठी भोकरच्या तहसीलवर मोर्चेही निघत आहे. येत्या काही दिवसांत पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळू शकेल पण पाऊस न झाल्यास मात्र तालुक्यातील शेतकऱ्यावर फार मोठे संकट ओढावणार आहे. पावसाअभावी बाजारपेठ ही मंदावली असून सर्वानाच मोठ्या संकटाच्या सामोरे जावे लागणार आहे.
(वार्ताहर)

Web Title: Under the bosom of Bhokar taluka day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.