अप्रमाणित बियाणे; ८ कृषी केंद्रांना नोटिसा
By Admin | Updated: August 1, 2014 00:30 IST2014-07-31T23:50:12+5:302014-08-01T00:30:45+5:30
हिंगोली : प्रमाणित न केलेले बियाणे ठेवणाऱ्या आठ कृषी केंद्रांना गुरूवारी जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी नोटिसा पाठविल्या आहेत.

अप्रमाणित बियाणे; ८ कृषी केंद्रांना नोटिसा
हिंगोली : प्रमाणित न केलेले बियाणे ठेवणाऱ्या आठ कृषी केंद्रांना गुरूवारी जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी नोटिसा पाठविल्या आहेत. लवकरच खुलासा न केल्यास या केंद्रांविरोधात कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी दिली.
बिजोत्पादनाचा कार्यक्रम न करता सागर अॅग्रो इन फुडस् आणि अनमोल सिड्स या कंपनीच्या नावाने सोयाबीनचे बियाणे विकले जात होते. उदगीर शहरातील कार्यवाहीच्या धर्तीवर २३ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दोन दिवस हिंगोली जिल्ह्यात तपासणी केली होती. त्यात हिंगोलीतील बालाजी कृषी केंद्रावर ४५० पैकी १२१ बॅगा विक्री झाल्या.उर्वरित २२९ बॅगांना सील मारले होते. दुसऱ्या दिवशी वसमत, कळमनुरीत केलेल्या पाहणीत सहा केंद्रांवर हे बियाणे आढळून आले होते. त्यावेळी बियाण्यांचे काढलेले नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. नुकताच त्याचा अहवाल आल्यानंतर गुरूवारी ‘केंद्रांचे परवाने रद्द करण्यात का येऊ नये’ अशी नोटीस जिल्ह्यातील आठ केंद्रांना पाठविली आहे. त्यात हिंगोलीतील २, वसमत आणि कळमनुरीतील अनुक्रमे तीन केंद्रांचा समावेश आहे. लवकर खुलासा न केल्यास या केंद्रांवर कारवाई केली जाणार असल्याचे नाब्दे म्हणाले. (प्रतिनिधी)