जिल्ह्यात वाळूची अवैैध वाहतूक वाढली
By Admin | Updated: February 22, 2015 00:36 IST2015-02-22T00:29:21+5:302015-02-22T00:36:49+5:30
लोहारा : येथील तहसीलदार ज्योती चौहाण यांनी दोन पथकांमार्फत मागील सहा-सात दिवसात अवैैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या सात वाहनांवर कारवाई केली आहे़

जिल्ह्यात वाळूची अवैैध वाहतूक वाढली
लोहारा : येथील तहसीलदार ज्योती चौहाण यांनी दोन पथकांमार्फत मागील सहा-सात दिवसात अवैैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या सात वाहनांवर कारवाई केली आहे़ संबंधितांकडून तब्बल सव्वा लाखाचा दंड वसुल करण्यात आला असून, या धाडसी कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत़
लोहारा तालुक्यातील सास्तूर, कमलापूर, खेड, भातागळी, कानेगाव आदी भागातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैैध उपसा करण्यात येतो़ शिवाय सोलापुरातील सीना नदीपात्रातील वाळूचीही मोठ्या प्रमाणात अवैैध वाहतूक करण्यात येते़ अनेक वाहनांमध्ये रॉयल्टीपेक्षा अधिकची वाळू असतानाही काही अधिकारी कारवाई करीत नव्हते़ वाळूमाफियांशी त्यांचे असलेले मैैत्रीचे संबंध त्यास कारणीभूत असल्याचे वारंवार आरोप होत आले आहेत़ मात्र, लोहारा तहसीलदार म्हणून पदभार घेतल्यानंतर ज्योती चौहाण यांनी कार्यालयाला शिस्त लावण्यासह प्रशासकीय कामालाही गती दिली आहे़ शिवाय त्यांनी वाळूमाफियांचे अवैैध धंदे बंद करण्यासाठी मंडळ अधिकारी ए़आऱयादव यांच्यासह तलाठी व मंडळ अधिकारी बी़एस़जगताप यांच्यासह सहा तलाठी असे दोन पथक तैैनात केले आहेत़ या पथकामार्फत मागील सहा-सात दिवसात विविध ठिकाणी अवैैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या सात वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे़ यात संबंधितांकडून जवळपास एक लाख २५ हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)