अवैैधरित्या वाळू वाहतूक; सहा वाहनांना ६ लाखांचा दंड

By Admin | Updated: May 26, 2017 00:35 IST2017-05-26T00:33:55+5:302017-05-26T00:35:56+5:30

कळंब : बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणाऱ्या सहा वाहनांना पकडून कळंब महसूल प्रशासनाने वाहनधारकांना तब्बल सहा लाखांचा दंड केला आहे.

Unauthorized sand transport; Six vehicles for six vehicles | अवैैधरित्या वाळू वाहतूक; सहा वाहनांना ६ लाखांचा दंड

अवैैधरित्या वाळू वाहतूक; सहा वाहनांना ६ लाखांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणाऱ्या सहा वाहनांना पकडून कळंब महसूल प्रशासनाने वाहनधारकांना तब्बल सहा लाखांचा दंड केला आहे. गुरूवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.
कळंब परिसरातून बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणारी वाहने जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कळंबचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अशोक नांदलकर, मंडळ अधिकारी अहिरे, देवकर, तलाठी राठोड यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. यावेळी टिप्पर क्रमांक एमएच-०४/सीसी-५६४८, एमएच-१३/एएस-३५८५, तसेच ट्रक क्रमांक एमएच-०९/क्यू- ७४६४ या वाहनांमध्ये रॉयल्टीपेक्षा चार ब्रास जास्त वाळू वाहतूक केल्यामुळे प्रत्येकी ८१ हजार ६०० रुपये दंड आकारण्यात आला. ट्रक क्रमांक एमएच-४२/टी-१०९७ या दोन वाहनांमध्ये रॉयल्टीपेक्षा पाच ब्रास जास्त वाळू वाहतूक केल्यामुळे प्रत्येकी १ लाख ४२ हजार ८०० रुपये दंड आकारण्यात आला. टिप्पर क्रमांक एमएच-१३/एएक्स- ४६३९ यामध्ये सात ब्रास जास्त वाळू आढळून आल्याने १ लाख ४२ हजार ८०० रुपये दंड करण्यात आला. या कार्यवाहीत महसूल प्रशासनाने एकूण ५ लाख ९१ हजार ६०० रुपये असा मोठा दंड ठोठावल्याने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
मागील चार महिन्यात कळंब महसूल प्रशासनाने १३ लाख रुपयांचा दंड या वाळूमाफियांना केला होता. या महिन्यात तब्बल ७ लाख रुपयांचा दंड केल्याने वाळू तस्करीविरुद्ध ही सर्वात मोठी कार्यवाही मानली जात आहे. आगामी काळातही नियमबाह्य वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध ही धडक कार्यवाही चालूच राहणार असल्ळाचे महसूल प्रशासनातील सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: Unauthorized sand transport; Six vehicles for six vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.