शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

३१३ गावांत विनापरवाना बांधकामांचा सपाटा; शुल्क वसुलीचे धोरण ठरेना 

By विकास राऊत | Updated: August 31, 2023 12:53 IST

प्राधिकरणाने फक्त एन-एच्या परवानगी देण्यातच स्वारस्य दाखविले.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मेट्रोपॉलिटीयन रिजनल डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (एएमआरडीए) च्या हद्दीतील ३१३ गावांमध्ये विनापरवाना बांधकामांचा सपाटा सुरू आहे. कंपाउंडिंग शुल्क घेण्याबाबत मागील सात वर्षांपासून नगरविकास खात्याकडून धोरण ठरविले जात नसल्यामुळे नगरनियोजनाचा पूर्ण बट्ट्याबोळ होत आहे. शिवाय शासनाचा हजारो कोटींचा महसूलही बुडाला आहे.

दरम्यान, मुंबईत याप्रकरणात बुधवारी (दि. ३०) गृहनिर्माण विभागाच्या सचिव वर्षा नायर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे प्रभारी आयुक्त मधुकरराजे आर्दड ऑनलाइन हजर होते. एएमआरडीएचे अधिकारी जायभाये हे बैठकीसाठी मुंबईत होते. मात्र, या बैठकीत कंपाउंडिंग शुल्क आकारण्याबाबत काहीही निर्णय झाला नाही. प्राधिकरणाच्या नियोजनाखाली आलेल्या भौगोलिक क्षेत्रात उद्योग, व्यावसायिक, हॉटेल्स बांधकामांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्राधिकरणाने फक्त एन-एच्या परवानगी देण्यातच स्वारस्य दाखविले.

नियम सर्वांना समान असावा....शुल्काबाबत धोरण ठरत नाही, म्हणून मंजुरीसाठी आलेल्या संचिक परत पाठविल्या जात आहेत. परंतु राजकीय दबावापोटी काही संचिका मंजूर केल्या जात आहेत. त्यात तीसगावमधील एका लोकप्रतिनिधीच्या बांधकामाचा समावेश आहे. कंपाउंडिंग शुल्काच्या किती संचिका नाकारल्या, किती संचिकांना मंजुरी दिली. याबाबत एएमआरडीएचे अधिकारी बोलत नाहीत. परंतु नागरिकांनी सर्वांना समान नियम असावा, अशी मागणी लावून धरली आहे.

मनुष्यबळ नसल्यामुळे सगळा बट्ट्याबोळ....निधी नियंत्रण व गुणवत्तेसह व्यवस्थापनाची जबाबदारी एएमआरडीएवर आहे. विकास योजनांचे आराखडे तयार करणे, आर्थिक नियोजन करणे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पायाभूत सुविधा प्रकल्प तयार करणे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांसाठी समन्वयक म्हणून काम करणे. वाहतूक, गृहनिर्माण, पाणीपुरवठा, पर्यावरण विकासासाठी काम करण्याची जबाबदारी प्राधिकरणावर आहे. परंतु मनुष्यबळ, इमारतीअभावी प्राधिकरणाचा बट्ट्याबोळ झाला आहे.

प्राधिकरण आयुक्त आर्दड काय म्हणाले...प्राधिकरण स्थापन झाल्यापासून आजवर होत गेलेल्या बांधकामांना जबाबदार कोण, असा प्रश्न प्रभारी प्राधिकरण आयुक्त तथा विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांना केला असता ते म्हणाले की, आजवर यासाठी धोरणच ठरले नाही. मागील चार वर्षांत या बाबी पूर्ण होणे गरजेचे होते. तसेच कंपाउंडिंग शुल्कासाठी बैठकही झाली नाही. नियमांत बसणारी बांधकामे अधिकृत होतील. अतिक्रमण झालेल्या जागांवर कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदारांना केल्या आहेत. प्राधिकरण सक्षम करण्यासाठी कर्मचारी भरती करावी लागेल. २०१७ पासून शुल्काचा निर्णय नाही. मग या प्राधिकरणाचा उपयोग काय? यावर आर्दड म्हणाले की, यात बऱ्याच बाबी आहेत. स्वतंत्र इमारत, कर्मचारी भरती, अतिक्रमणे, नियमित बांधकामे असे काम करावे लागेल.

एएमआरडीएच्या स्थापनेतील काही महत्त्वाचे टप्पे-मार्च २०१७ मध्ये औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी (एएमआरडीए) आकृतीबंध निश्चित झाला.-पीएमआरडीए, एमएमआरडीएच्या धर्तीवर एएमआरडीएची स्थापना झाली. १५ जुलै २०१९ रोजी प्राधिकरणाची दुसरी बैठक झाली.-जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हद्दीतील ३१३ गावांतील अकृषकचे (नॉन अॅग्रिकल्चर/एन-ए), भोगवटा, बांधकाम परवागनी देण्याचे अधिकार प्राधिकरणाला दिले.-महानगरचे प्रभारी आयुक्त म्हणून सध्या विभागीय आयुक्तांकडे पदभार आहे.-३० नोव्हेंबर २०१८च्या निर्णयानुसार प्राधिकरणाला अधिकारी, कर्मचारी नियुक्तीबाबत शासनाने मंजुरी दिली.-मनपाप्रमाणे वेगवेगळे विभाग प्राधिकरण कार्यालयात असणार आहेत. बांधकाम विभाग, पाटबंधारे, महावितरण, कृषी विभाग येथे जोडलेला असेल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद