आॅईलअभावी दुरूस्ती रखडली

By Admin | Updated: June 23, 2017 00:59 IST2017-06-23T00:57:29+5:302017-06-23T00:59:14+5:30

जालना : महावितरणकडे आॅईलसाठा कमी असल्याने रोहित्र दुरूस्तीवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

Unable to save the file | आॅईलअभावी दुरूस्ती रखडली

आॅईलअभावी दुरूस्ती रखडली

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महावितरणकडे आॅईलसाठा कमी असल्याने रोहित्र दुरूस्तीवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. दोन्ही विभाग मिळून ७० पेक्षा अधिक रोहित्र नादुरूस्त आहेत.
महावितरणच्या विभाग व दोन मिळून जिल्ह्यात ६३ च १०० केव्हीए क्षमतेचे पंधरा हजार पेक्षा अधिक रोहित्र आहेत. मात्र महावितरणचे नियोजन तसेच ज्या भागातील वसुलीचे प्रमाण कमी व चोरी अधिक आहे त्या भागातील रोहित्रांची दुरूस्ती संथगतीने होते. मात्र ज्या भागात शंभर टक्के वसुली असूनही रोहित्र मिळण्यास अडचणी येत आहेत.
दोन्ही विभागत मिळून ७० रोहित्र दुरूस्तीसाठी आलेले आहेत. मात्र गत आठवड्यात महाावितरणकडे रोहित्रात आवश्यक असणारे आॅईल उपलब्ध नसल्याने दुरूस्त रोहित्रही महावितरणच्या कार्यशाळेत पडून आहेत. दर महिन्यात औरंगाबाद येथील भांडारातून जालना कार्यशाळेस आईल मिळते. मात्र काही दिवसांपासून आॅईलचा पुरवठा कमी होत असल्याने रोहित्रांची संख्या वाढत आहे.
आज रोजी थकबाकीमुळे काही ठिकाणी रोहित्र दुरूस्ती करण्यात येत नसल्याचे सांगण्यात येते. सर्वच गावांनी शंभर टक्के वसुली दिल्यास रोहित्र दुरूस्ती तसेच अन्य कामेही गतीने पूर्ण होतील असे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
एका विभागात चार व दुसऱ्या विभागात चार असे आठ तालुक्यांतील अनेक रोहित्र नादुरूस्त आहेत. विशेष म्हणजे हंगाम नसतानाही रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागात आकडे टाकून वीज चोरी होते. यामुळे अचानक वीज दाब वाढून रोहित्र निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे.
पावसाळ्याच्या दिवसात रोहित्रावर भार नसला तरी आकड्यांमुळे रोहित्र जळत आहेत.

Web Title: Unable to save the file

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.