देगलूर परिषदेच्या अध्यक्षपदी उज्ज्वला पद्मवार, उपाध्यक्षपदी निलमवार

By Admin | Updated: August 17, 2014 00:54 IST2014-08-17T00:40:47+5:302014-08-17T00:54:16+5:30

देगलूर : देगलूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला पद्मवार यांची तर उपनगराध्यक्षपदी अविनाश निलमवार यांची निवड झाली.

Ujjwala Padmavar as Degloor Council President, Nilmawar as Deputy Chairman | देगलूर परिषदेच्या अध्यक्षपदी उज्ज्वला पद्मवार, उपाध्यक्षपदी निलमवार

देगलूर परिषदेच्या अध्यक्षपदी उज्ज्वला पद्मवार, उपाध्यक्षपदी निलमवार

देगलूर : देगलूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला पद्मवार यांची तर उपनगराध्यक्षपदी अविनाश निलमवार यांची निवड झाली.
काँग्रेसच्या नगरसेविका विजयमाला टेकाळे यांनी मुदतीत माघार घेतल्याने राष्ट्रवादीच्या उज्ज्वला पद्मवार यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा प्राधिकृत अधिकारी जयराम कारभारी यांनी विशेष सभेत केली. तर उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाकडून नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. यामुळे राष्ट्रवादीकडून नगरसेवक निलमवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या नगरसेवकांच्या विशेष सभेकडेही बहुतांश काँग्रेस नगरसेवकांनी पाठ फिरविली. (वार्ताहर)

Web Title: Ujjwala Padmavar as Degloor Council President, Nilmawar as Deputy Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.