उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकाला शिवसैनिकांंकडून धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:11 IST2017-11-13T00:11:02+5:302017-11-13T00:11:08+5:30

कन्नड येथील कार्यक्रमासाठी आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकाला औरंगाबाद विमानतळावर शिवसैनिकांनीच धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 Uddhav Thackeray's security officer hit by Shiv Sainiks | उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकाला शिवसैनिकांंकडून धक्काबुक्की

उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकाला शिवसैनिकांंकडून धक्काबुक्की

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कन्नड येथील कार्यक्रमासाठी आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकाला औरंगाबाद विमानतळावर शिवसैनिकांनीच धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कन्नड येथील एका कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी औरंगाबाद विमानतळावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेतील सर्वच गटांनी जोरदार तयारी केली होती. यामुळे विमानतळावर गर्दी उसळली. या गर्दीमध्ये प्रत्येक जणाला उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचायचे होते. या गर्दीला आवरण्याचा प्रयत्न त्यांचे सुरक्षारक्षक करत होते. याचवेळी एका सुरक्षारक्षकाकडून नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना धक्का लागला. याच राग मनात ठेवत जंजाळ यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे समोरच्या गाडीत बसल्यानंतर पाठीमागच्या गाडीत सुरक्षारक्षक बसत असताना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचे समजते. हा वाद विकोपाला जात असतानाच महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी मध्यस्थी करत शिवसैनिकांना शांत केले. यामुळे पुढील सर्व अनर्थ टळाला असल्याचा दावा जंजाळविरोधी गटाने केला आहे. तर या घटनेविषयी राजेंद्र जंजाळ यांना विचारले असता, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याही सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की झाली नसून, सुरक्षेसाठी तैनात असलेल्या स्थानिक व्यक्तीसोबत कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. हा प्रकार केवळ गर्दीमुळे झाला असून, यात कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचे सांगितले.

Web Title:  Uddhav Thackeray's security officer hit by Shiv Sainiks