उध्दव ठाकरे यांचे परंड्यात जंगी स्वागत
By Admin | Updated: July 21, 2014 00:23 IST2014-07-20T23:43:18+5:302014-07-21T00:23:49+5:30
परंडा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी करमाळा येथील जाहीर सभा आटोपून बार्शीला जात असताना परंडा व सोनारीला भेट दिली.

उध्दव ठाकरे यांचे परंड्यात जंगी स्वागत
परंडा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी करमाळा येथील जाहीर सभा आटोपून बार्शीला जात असताना परंडा व सोनारीला भेट दिली. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
यावेळी त्यांनी तालुक्यातील सोनारी येथे श्री काळ भैरवनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर शिवाजी नगर परिसरातील भैरवनाथ साखर कारखान्यास त्यांनी भेट दिली. येथे कारखान्याचे चेअरमन प्रा. तानाजी सावंत यांनी ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते रामदास कदम, संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूरकर यांचे स्वागत केले. तसेच उद्धव ठाकरे यांना सावंत कुटुंबियांच्या वतीने चांदीची तलवार भेट देण्यात आली. यावेळी शिवसेनेचे माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत, जि. प. चे अर्थ व बांधकाम सभापती धनंजय सावंत, जिल्हा प्रमुख सुधीर पाटील, लोकसभा सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, आ. ज्ञानराज चौगुले, आ. ओमराजे निंबाळकर, अनिल सावंत, केशव सावंत, पृथ्वीराज सावंत, गिरीराज सावंत आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तेथून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परंडा मार्गे बार्शीकडे रवाना झाले.
दरम्यान ठाकरे यांच्या स्वागतासाठी परंडा येथील शिवाजी चौकात हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे ठाकरे यांनी येथे थांबून शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पाठीमागील विधानसभा निवडणुकीत निसटत्या मताने शिवसेना पराभूत झाली आहे. मात्र, ही कसर यावेळी भरुन काढत यावेळी शिवसेनेचा उमेदवार विधानसभेत पाठवा. मतदारसंघातील जनता शिवसेनेच्या पाठीशी राहिल्यास निवडणुकीच्या वेळेस मी पुन्हा तुमच्या भेटीला येईन, अशी ग्वाहीही ठाकरे यांनी यावेळी दिली.
या प्रसंगी माजी आ. ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह जि. प. गटनेते दत्ता साळुंके, पं. स. उपसभापती मेघराज पाटील, तालुका प्रमुख गौतम लटके, रिपाइंचे प्रदेश चिटणीस संजय बनसोडे, हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कांबळे, सिध्देश्वर पाटील, रणजितसिंह पाटील, शहर प्रमुख अॅड. जहीर चौधरी, उपप्रमुख सुभाष शिंदे, युवा सेना तालुकाप्रमुख विशाल देवकर, उपप्रमुख माऊली गोडगे, शंकर इतापे, इस्माईल कुरेशी, शिवाजी मेहेर, संजय कदम आदी उपस्थित होते. शिवसैनिकांना मार्गदर्शन केल्यानतंर पक्ष प्रमुख ठाकरे बार्शी येथे होणाऱ्या सभेसाठी रवाना झाले.
दरम्यान, सोनारी येथे आल्यानंतर सावंत यांच्या पुढाकारातून शिवसेनेचे चार कारखाने उभे राहिल्याचे सांगितल्यानंतर ठाकरे यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)
पावसासाठी भैरवनाथाला साकडे
परंड्यासह मराठवाड्यात पावसाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाणीटंचाईचे भीषण सावट उभे आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोनारी येथील श्री काळ भैरवनाथाचे दर्शन घेतल्यानंतर पावसासाठी साकडे घातले. विधानसभेवर भगवा ध्वज फडकविण्यासाठी बळ दे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले.