शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

Uddhav Thackeray: ‘तेव्हा भाजपाने गणेशोत्सवादिवशीच भारत बंद केला, हे यांचं हिंदुत्व’, उद्धव ठाकरेंनी इतिहास काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 21:48 IST

Uddhav Thackeray Aurangabad Sabha: औरंगाबादमध्ये शिवसेनेने जबरदस्त शक्तिप्रदर्शन करत आयोजित केलेल्या या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या हिंदुत्वाचे वाभाडे काढले. तसेच एकदा महागाईविरोधात भाजपाने गणेशोत्सवादिवशीच भारत बंदची घोषणा केली होती, हेच यांचं हिंदुत्व का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

औरंगाबाद - राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आज भाजपावर चौफेर हल्ला चढवला. औरंगाबादमध्ये शिवसेनेने जबरदस्त शक्तिप्रदर्शन करत आयोजित केलेल्या या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या हिंदुत्वाचे वाभाडे काढले. तसेच एकदा महागाईविरोधात भाजपाने गणेशोत्सवादिवशीच भारत बंदची घोषणा केली होती, हेच यांचं हिंदुत्व का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने एकदा भारत बंद नारा दिला होता.  शिवसेनासोबत होती म्हणून, नाहीतर त्यांची बंद करण्याची ताकद नाही. बंद घोषित करण्यासाठी जो दिवस निवडला, तो दिवस नेमका गणपतींच्या आगमनाचा होता. शिवसेनाप्रमुखांना मी विचारलं, तेव्हा ते आपण या बंदमध्ये सहभाही व्हायचं नाही, असं ते म्हणाले. त्यानंतर मी  सुषमा स्वराज यांना फोन केला. त्यांना म्हटलं बंद दिवशी गणेशोत्स्व आहे. त्यामुळे आमची अडचण होणार आहे. तर त्या म्हणाल्या, गणपती तर दहा दिवस असतो. तेव्हा मी सांगितलं गणपतींच्या आगमनापासून आनंदोत्सवास सुरुवात होते.  आपण नाही म्हणालो. माफ करा आम्ही या बंदमध्ये सहभागी होऊ शकत नाही, असं सांगितलं, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

त्यावेळी तुम्ही ना हिंदूचे सण बघत नव्हतात, ना लोकांचा आनंद बघत होता. केवळ राजकारण करायचं म्हणून तुम्ही भारत बंद करत होता. भारत बंद म्हणजे बंद. गणपती आले काय गेले काय, हिंदूंचा सण आहे, काही का असेना आम्ही बंद करणार, अशी तुमची भूमिका होती. बाळासाहेबांची शिवसेना होती म्हणून तेव्हा हा बंद झाला नाही. शिवसेना नसती तर काय झालं असतं देव जाणो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

पेट्रोल वाढीनंतर बैलगाडीतून जाणारी अटलजींची भाजपा आज कुठे गेली. हेच तुम्हाला हवे होते का?  प्रवक्ते वाचाळपणे बोलतात. देशाची अब्रू गेली भाजपची नाही. मी विचारतो भाजपला अरे कुठे नेऊन ठेवणार आहात भारत आणि महाराष्ट्र माझा. तुम्ही शिवसेनेला नाही हिंदुत्वाला बदनाम करताय. शिवसेनेचे विचार तुम्ही काढू शकणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठामपणे सांगितले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादBJPभाजपा