शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray: 'व्यासपीठावर उपस्थित माझे भावी सहकारी...', दानवे व्यासपीठावर असताना मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं विधान, सर्वांच्या भुवया उंचावल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 11:36 IST

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री ठाकरेंनी केलेल्या एका विधानानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Uddhav Thackeray: औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे एकाच व्यासपीठावर होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी केलेल्या एका विधानानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी भविष्यात भाजपासोबतच्या युतीबाबतचं सूचक विधानच केल्याचं औरंगाबादमध्ये पाहायला मिळत आहे. 

हे रडीचे डाव... सोनू सूदच्या घरावरील धाडीनंतर शिवसेनेचा केंद्रावर निशाणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना 'व्यासपीठावर उपस्थित आजी, माजी आणि भविष्यात एकत्र आलो तर माझे भावी सहकारी...', असं विधान केलं आणि यावेळी मुख्यमंत्र्यांचा रोख भाजपाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या दिशेनं होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाची कार्यक्रमात जोरदार चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आजी सहकारी म्हणजेच काँग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात, माजी सहकारी म्हणून उपस्थित भाजपाचे नेते असा उल्लेख केल्यानंतर भविष्यात एकत्र आलो तर भावी सहकारी असं म्हणत त्यांनी भाजपा नेत्यांकडे पाहिलं. उद्धव ठाकरेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलं आहे. 

चंद्रकांत पाटीलही म्हणाले माजी मंत्री म्हणू नका!भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच एका कार्यक्रमात मला आता माजी मंत्री म्हणू नका एक-दोन दिवसांत काय ते कळेल, असं विधान केलं होतं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाचे संदर्भ लावले जात आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या एका विधानामुळे लगेच तर्कवितर्क लावण्याची काही गरज नाही, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाShiv Senaशिवसेना