शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

उद्धवसेनेची निवडणुकीआधीच नामुष्की; किशनचंद तनवाणींची माघार कोणाच्या पथ्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 12:43 IST

औरंगाबाद मध्य मतदारसंघात राजकीय भूकंप; जैस्वाल, सिद्दीकींचा मार्ग मोकळा होणार का?

- मुजीब देवणीकरछत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास राजकीय भूकंप पाहायला मिळाला. उद्धवसेनेचे अधिकृत उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली. त्यामुळे ही राजकीय खेळी कोणाला फायदेशीर ठरणार यावर तर्कवितर्क सुरू झाले. तनवाणी यांची माघार शिंदेसेनेचे प्रदीप जैस्वाल, एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांचा मार्ग मोकळा करणारी ठरेल का? बदललेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता एमआयएम मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणाला आणखी एखादा मास्टर स्ट्रोक खेळेल का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

तनवाणी यांनी २०१४ मध्ये भाजपाकडून मध्य मतदारसंघात नशीब अजमावले होते. त्यांच्यासमोर शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल होते. दोघांच्या मतविभाजनाचा फायदा एमआयएमचे इम्तियाज जलील यांना झाला होता. मध्य मतदारसंघात यंदाही २०१४ सारखीच परिस्थिती निर्माण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २४ ऑक्टोबरला प्रसिद्ध केले होते. उद्धवसेना आणि शिंदेसेनेत मतविभाजन होणार हे अटळ आहे. आता उद्धवसेनेने पर्यायी उमेदवार दिला. जैस्वाल यांच्यासमोर उद्धवसेनेची मशाल किती प्रकाश पाडेल हे २० ऑक्टोबरला कळेल. या मतदारसंघात ३ लाख ६६ हजार मतदान आहे. त्यात महिलांची संख्या १ लाख ७८ हजार तर पुरुष मतदारांची संख्या १ लाख ८७ हजार आहे. शिंदेसेनेकडे काही प्रमाणात लाडकी बहीण आहे. उद्धवसेनेकडे काय? मतदारांना दाखविण्यासाठी विकास कामेही नाहीत.

एमआयएम पक्षाला उकळ्या...‘मध्य’मधील बदलेल्या राजकीय परिस्थितीमुळे एमआयएम पक्षाला मात्र, उकळ्या फुटत आहेत. आपला मार्ग आणखी सोपा झाला, असे त्यांना आज तरी वाटू लागले. या मतदारसंघात ३५ टक्यांहून अधिक मुस्लीम मते आहेत. या ठिकाणी वंचित फॅक्टर वगळता मत विभाजनाचा फारसा धोकाही नाही. एमआयएमने अगोदरच येथे नासेर सिद्दीकी यांना निवडणूक रिंगणात उतरवून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिलेला आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत एमआयएम या मतदारसंघात आणखी एखादा मास्टर स्ट्रोक तर खेळणार नाही ना... अशी शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-central-acऔरंगाबाद मध्यKishanchand Tanvaniकिशनचंद तनवाणीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी