टायपिंग परीक्षेत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:00 IST2017-08-12T00:00:47+5:302017-08-12T00:00:47+5:30
: मागील चार दिवसांपासून जिल्ह्यातील सात केंद्रांवर टायपिंग परीक्षा सुरू आहे. बीड शहरातील मिलिया (मुलींचे) महाविद्यालयातील केंद्रावर पोलिसांच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी परिस्थिती शुक्रवारी पाहावयास मिळाली

टायपिंग परीक्षेत गोंधळ
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यातील सात केंद्रांवर टायपिंग परीक्षा सुरू आहे. बीड शहरातील मिलिया (मुलींचे) महाविद्यालयातील केंद्रावर पोलिसांच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी परिस्थिती शुक्रवारी पाहावयास मिळाली. यावरून टायपिंग परीक्षेतील गोंधळ उघड झाला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने मागील ४ दिवसांपासून जिल्ह्यातील ७ केंद्रांवर टायपिंग, तर एका केंद्रावर स्टेनोची परीक्षा सुरू आहे. हजारो विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. वास्तविक पाहता परीक्षेतील उमेदवार हा केंद्राबाहेर असतो, तर दुसराच विद्यार्थी त्याच्या जागी परीक्षा देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शुक्रवारी बीडमधील मिलिया महाविद्यालयातही असाच प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचे दिसून आले. या ठिकाणी नेमलेले पोलीस कर्मचारी ओळखीच्या लोकांना परीक्षा केंद्रात घेताना दिसून आले. जे अर्थपूर्ण ‘सहकार्य’ करणार नाहीत, त्यांना मात्र त्या पोलीस कर्मचाºयाने ‘वन वे’ मार्गाने अरेरावी करीत बाहेर काढल्याच्या तक्रारी ऐकावयास मिळाल्या. पोलिसाच्या दुजाभाव व असभ्य वर्तणुकीमुळे सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.