बनावट धनादेशाद्वारे फसवणुकीचे प्रकार वाढले
By Admin | Updated: December 31, 2016 23:48 IST2016-12-31T23:42:30+5:302016-12-31T23:48:31+5:30
जालना : नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या नोटाटंचाईचा फायदा काही महाभाग घेत आहेत.

बनावट धनादेशाद्वारे फसवणुकीचे प्रकार वाढले
जालना : नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या नोटाटंचाईचा फायदा काही महाभाग घेत आहेत. खरेदी अथवा मालाची नोंदणी केल्यावर बनावट अथवा बंद खात्याचा धनादेश देण्याचे प्रकार वाढले आहेत. गत काही दिवसांत असे चार ते पाच समोर आले आहेत. मात्र, या विषयी पोलिसांत तक्रार देण्यात आलेली नाही.
हजार व पाचशे रूपयांच्या नोटाबंदीनंतर नोटाटंचाई निर्माण झालेली आहे. दोन हजारच्या नोटा उपलब्ध असल्या तरी पाचशे व शंभर रूपयांच्या नोट मिळणे जिकिरीचे झाले आहे. बँकेतूनही २४ हजार रूपयांपेक्षा जास्त रक्कम मिळत नाही. एटीएममधूनही दोन ते चार हजार रूपयांची रक्कम निघत आहे. याचा फायदा काहीजण उचलत आहे. आठवडी बाजार, मोठी उलाढाल अथवा धनादेश देताना व्यापार करताना फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. जालना बाजारपेठेत असे तीन ते चार प्रकार घडले असून, मात्र या संदर्भात कोणही तक्रार देण्यास पुढे आलेले नाही.
मोठ्या रकमेच्या वस्तूची खरेदी केल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यास रोख रक्कम नसल्याने कॅशलेसच्या नावाखाली धनादेश देण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र धनादेशांमध्ये गडबड होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बनावट धनादेशऐवजी खाते बंद झाल्याचा धनादेश देण्याचे प्रकार घडू शकतो, एका बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. नोटाटंचाईमुळे असे प्रकार असे प्रकार घडू शकतात. बँकेतही धनादेशावरून वाद वाढत असल्याचे सांगण्यात आले.