उपविभागीय अधिकाऱ्यांची गाडी अडविण्याचा प्रकार
By Admin | Updated: December 19, 2015 23:41 IST2015-12-19T23:33:49+5:302015-12-19T23:41:52+5:30
उस्वद/मंठा : उपविभागीय अधिकाऱ्यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार मंठा-उस्वद मार्गावरील माळतोंडी पाटीवर शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.

उपविभागीय अधिकाऱ्यांची गाडी अडविण्याचा प्रकार
उस्वद/मंठा : उपविभागीय अधिकाऱ्यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार मंठा-उस्वद मार्गावरील माळतोंडी पाटीवर शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.
उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे हे शुक्रवारी उस्वदहून मंठ्याकडे जात होते. दरम्यान, किर्तापूर ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात वाहनाने पोलिंग पाटी व केंद्राच्या तपासणीसाठी जात होते. याचवेळी क्रमांक नसलेल्या दुचाकीस्वारांनी माळतोंडी पाटीजवळ वाहनाचा पाठलाग करुन अडविले. यावर तुम्ही गाडी का रोखली, अशी विचारणा लोखंडे यांनी केली असता त्यांनी त्यांची मोटारसायकल रस्त्यावर सोडून दिली व शेतात पळ काढला.
लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात दोन व्यक्तींविरुध्द मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हा प्रकार वाळूमाफियांनी केल्याची मंठा तालुक्यात चर्चा असून, वाळूमाफियांवर जरब बसविणार कोण , असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने अवैध वाळू उपशाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.