नांदगाव घाटाजवळ लूटमारीचा प्रकार

By Admin | Updated: March 20, 2016 00:45 IST2016-03-20T00:34:00+5:302016-03-20T00:45:14+5:30

येरमाळा : प्रवाशी म्हणून जीपमध्ये घेतलेल्या दोघांना शिवीगाळ, मारहाण करून ४२ हजार रुपये घेवून चोरट्यांनी लूटमार केली़

The type of robbery near Nandgaon Ghat | नांदगाव घाटाजवळ लूटमारीचा प्रकार

नांदगाव घाटाजवळ लूटमारीचा प्रकार


येरमाळा : प्रवाशी म्हणून जीपमध्ये घेतलेल्या दोघांना शिवीगाळ, मारहाण करून ४२ हजार रुपये घेवून चोरट्यांनी लूटमार केली़ ही घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास येरमाळा चौरस्ता ते नांदगाव घाटादरम्यान घडली असून, या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील हिंगणी येथील उत्तम उर्फ नाना गौतम जाधव हे गुरूवारी रात्रीच्या सुमारास पाहुण्यासह येरमाळा (ताक़ळंब) येथील चौरस्त्यावर थांबले होते़ त्यावेळी तेथे आलेल्या एका जीप चालकाने त्यांना कुठे जायचे आहे ? असे विचारले़ त्यावेळी उत्तम जाधव यांनी नगरला जायचे आहे, असे सांगितल्यानंतर त्यांना जीपमध्ये बसविण्यात आले़ जीप येरमाळा चौरस्ता ते नांदगाव घाटादरम्यान जात असताना उत्तम जाधव यांना मारहाण, शिवीगाळ करीत त्यांच्याकडील रोख ४२ हजार रूपये व मोबाईलची बॅटरी काढून घेतली़ नांदगावच्या पुढे जाधव यांना सोडून चोरटे घटनास्थळावरून फरार झाले़ याबाबत उत्तम जाधव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जिरगे हे करीत आहेत़
या घटनेने येरमाळ्यासह परिसरात एकच खळबळ उडाली असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे़ (वार्ताहर)

Web Title: The type of robbery near Nandgaon Ghat