दुचाकीवरील दोन तरुणांचा पुलाला धडकून जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:45 IST2017-10-28T00:45:51+5:302017-10-28T00:45:59+5:30
मोटारसायकल पुलाच्या कठड्याला धडकून त्यावरील दोन तरुण नदीपात्रात पडल्याने जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील टापरगावच्या शिवना नदीवरील पुलावर शुक्रवारी पहाटे घडली.

दुचाकीवरील दोन तरुणांचा पुलाला धडकून जागीच मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
हतनूर : मोटारसायकल पुलाच्या कठड्याला धडकून त्यावरील दोन तरुण नदीपात्रात पडल्याने जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील टापरगावच्या शिवना नदीवरील पुलावर शुक्रवारी पहाटे घडली.
प्रकाश विठ्ठल बर्डे (२३) व श्याम किसन भगत (२२, रा. माळीवाडा, दौलताबाद) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही मित्र एम.एच. २० -सीपी-७८४८ या क्रमांकाच्या मोटारसायकलने कन्नडहून औरंगाबादकडे पहाटे तीनच्या सुमारास येत असताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व पुलाच्या कठड्याला धडकून दोघेही पुलाखाली ६० फूट नदीपात्रात पडून जागीच गतप्राण झाले. शिवना नदीपात्रात पाणी नसल्याने दोन्ही तरुणांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी ७ वाजता नजरेस पडले. घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक रोहित बेंबरे यांनी दोघांचे मृतदेह हतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविले. पुढील तपास बेंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार जयंत सोनवणे हे करीत आहेत.