दोन तरुणांची आत्महत्या
By Admin | Updated: April 28, 2015 00:31 IST2015-04-28T00:09:41+5:302015-04-28T00:31:20+5:30
बीड : जिल्ह्यातील शिरुरकासार तालुक्यातील कमळेश्वर धानोरा येथील व परळी तालुक्यातील हिवरा येथील एका तरुणाने वेडाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत.

दोन तरुणांची आत्महत्या
बीड : जिल्ह्यातील शिरुरकासार तालुक्यातील कमळेश्वर धानोरा येथील व परळी तालुक्यातील हिवरा येथील एका तरुणाने वेडाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत.
शिरुर कासार तालुक्यातील कमळेश्वर धानोरा येथील दिगंबर शिवाजी जोगदंड (वय ३०) यांनी घरातील लोखंडी अँगलला रविवारी रात्री गळफास घेतला. त्या शेतकऱ्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला होता. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हे कळु शकले नाही. संदीपान जोगदंड यांच्या खबरेवरुन अकस्मात मृत्यूची नोंद शिरुर ठाण्यात नोंद झाली आहे.
दुसरी घटना परळी तालुक्यातील सिरसाळ्यापासून जवळ असलेल्या हिवरा येथे घडली. प्रशांत प्रताप तपसे (वय २५) याने वेडाच्या भारात शेतातील लिंबाच्या झाडास ठिबकच्या वायरने रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा भाऊ भारत तपसे यांच्या खबरेवरुन सोमवारी सिरसाळा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सर्जेराव सुक्रे करीत आहेत. (प्रतिनिधी)