तीन वेगवगळ्या अपघातांत महिलेसह दोन तरुणांचा मृत्यू

By Admin | Updated: February 27, 2017 00:32 IST2017-02-27T00:30:49+5:302017-02-27T00:32:31+5:30

जालना : शहरासह जिल्ह्यात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण ठार झाले आहे.

Two young people with a woman in three different accidents | तीन वेगवगळ्या अपघातांत महिलेसह दोन तरुणांचा मृत्यू

तीन वेगवगळ्या अपघातांत महिलेसह दोन तरुणांचा मृत्यू

जालना : शहरासह जिल्ह्यात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण ठार झाले आहे. यातील एका अपघातात पादचारी वृद्ध महिलेचा तर अन्य दोन घटनांत दोन तरूणांचा मृतांत समावेश आहे.
पहिल्या घटनेत औद्योगिक वसाहत येथील पाण्याच्या टाकी जवळ भरधाव ट्रक (एम.एच. २१ एक्स ४८१६ ) ने रस्त्याने जाणाऱ्या रंगूबाई भिकाजी पाटोळे (७० रा. क्रांतीनगर जालना) या महिलेस जोराची धडक दिल्याने ती जागीच ठार झाली. ही घटना रविवारी दुपारी २. ३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात साहेबराव भिकाजी पाटोळे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत जालना तालुक्यातील फुलेनगर जामवाडी येथील योगेश नारायण बडदे (१८) हा शेतातून घराकडे पायी जात असताना फुलेनगर तर उम्रद रस्त्यावर ट्रॅक्टर (एम.एच २१ डी. २५२०) ने त्यास जोराची धडक दिल्याने तो जागीच ठार झाला.
याप्रकरणी किसन बडदे यांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Two young people with a woman in three different accidents