शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

अशी केली दोन वर्षांत ५८ किलो सोन्याची हेराफेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:40 IST

औरंगाबाद : वामन हरी पेठे ज्वेलर्सचा व्यवस्थापक अंकुर राणे याने दुकानातील सुवर्णलंकार विक्री झाल्याच्या पावत्या तयार करून त्यावर दुकानाच्या ...

औरंगाबाद : वामन हरी पेठे ज्वेलर्सचा व्यवस्थापक अंकुर राणे याने दुकानातील सुवर्णलंकार विक्री झाल्याच्या पावत्या तयार करून त्यावर दुकानाच्या नियमाप्रमाणे दागिन्याचे टॅग लावत होता. त्यामुळे दुकान मालकास या विक्री व्यवहाराविषयी संशय येत नव्हता. राणेने ग्राहक राजेंद्र जैन, भारती जैन आणि लोकेश जैन यांना काही दागिने विक्री केल्याचे दाखविले. त्या बदल्यात जैन कुटुंबियाकडून रोख रकमेऐवजी धनादेश घेतले. या पद्धतीने दोन वर्षांत तब्बल ५८ किलो सोन्याचे अलंकार दुकानातून पळविण्यात आले. जैन यांच्याकडून घेतलेले बहुतेक धनादेश अनादरीत झालेले आहेत.राणे याने दोन वर्षांपासून सोन्याची हेराफेरी सुरू केली. सुवर्णपेढीतील सर्व खरेदी-विक्रीचा व्यवहार अॉनलाईन असल्याने हा प्रकार मालकांच्या निदर्शनास येऊ शकतो, ही बाब राणेला माहीत होती. दागिन्यांची चोरी केल्यानंतर त्या दागिन्यांचे बारकोड टॅग काढून तो दागिना विक्री केल्याची नोंद रजिस्टरला घेई. त्याबाबतचे बनावट बिल (पावती) तो तयार करीत होता. दोन वर्षांच्या कालावधीत राणेने ११ कोटी ८८ लाख ४९ हजार ४२६ रुपयांचे दागिने विक्री केल्याची ४६६ बनावट बिले (पावत्या) तयार केल्याचे समोर आले. दागिने विक्री केल्याच्या पावत्या आणि दुकानाच्या हिशेब वहीतील नोंदीमध्ये ६ कोटी ४३ लाख रुपयांची तफावत असल्याचे दुकानमालक विश्वनाथ पेठे यांच्या लक्षात आले. याबाबत राणेकडे त्यांनी जाब विचारल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.राणेला २५ टक्के हिस्सासोने चोरीच्या गोरखधंद्यात आरोपी राजेंद्र जैन, भारती जैन आणि लोकेश जैन हे समान भागीदार होते. चोरलेल्या दागिन्याच्या किमतीची २५ टक्के रक्कम अंकुर राणेला मिळत होती, तर उर्वरित तिघे हे ७५ टक्क्यांत वाटेकरी होते. दागिन्यांच्या किमतीची २५ टक्के रक्कम मिळत गेल्याने जैन हा आपला मोठा ग्राहक असल्याचे सांगून राणे त्याला उधारीवर दागिने देत असल्याचे सहकारी कर्मचाऱ्यांना सांगत असे.गुन्ह्याची कबुली देणारा मुख्य कार्यालयास ई-मेलदोन वर्षांत ५८ किलो सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली देणारा ई-मेल आरोपी राणे याने वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या मुंबईतील मुख्य कार्यालयात पाठविला. या ई-मेलमध्ये राणेने नमूद केले की, ‘मी राजेंद्र जैन, भारती जैन व लोकेश जैन यांनी संगनमताने गुन्हा केलेला आहे. दुकानातील चोरी केलेला माल २० जून २०१९ पर्यंत आणून देतो.’

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी