शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षीय चिमुकल्याचा गुलाबजामूनच्या गरम पाकामध्ये पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 13:58 IST

गरम पाकात खेळता खेळता पडल्याने गंभीर भाजलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबाद : घरातील धार्मिक कार्यक्रमानिमित्त बनत असलेल्या गुलाब जामूनच्या  गरम पाकात खेळता खेळता पडल्याने गंभीर भाजलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजवीर नितीन मेघावाले असे मृत चिमुकल्याचे नाव असून ही घटना गुरुवारी दुपारी दलालवाडी भागात घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दलालवाडी भागात राहणाऱ्या मेघावाले यांच्या कुटुंबात गुरुवारी (दि.२२) धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी घराजवळच स्वयंपाक बनविणे सुरू होते. याच ठिकाणी दोन वर्षीय राजवीर खेळत होता. स्वयंपाकासाठी तयार करण्यात आलेला गुलाब जामूनसाठीचा उकळलेला पाक थंड होण्यासाठी ठेवून घरातील मंडळी कामात व्यग्र होते. त्यावेळी राजवीर अचानक पाकाच्या भांड्यात पडला . यानंतर त्याला लगेच खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. 

यानंतर अधिक उपचारासाठी  राजवीरला घाटी रुग्णालायत दाखल केले होते. उपचार सुरू असताना आज पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादfireआगDeathमृत्यू