नाराजांच्या वॉर्डांत दोन कामे

By Admin | Updated: December 23, 2015 00:05 IST2015-12-22T23:21:48+5:302015-12-23T00:05:29+5:30

औरंगाबाद : कामे होत नसल्याबद्दल स्थायी समितीत ओरड झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रभारी आयुक्तांनी मंगळवारी स्थायी समिती सदस्यांची तातडीची बैठक घेतली.

Two works in angry ward | नाराजांच्या वॉर्डांत दोन कामे

नाराजांच्या वॉर्डांत दोन कामे

औरंगाबाद : कामे होत नसल्याबद्दल स्थायी समितीत ओरड झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रभारी आयुक्तांनी मंगळवारी स्थायी समिती सदस्यांची तातडीची बैठक घेतली. सर्व सदस्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येक सदस्याचे दोन-दोन कामे करून देण्याचे आश्वासन दिले. सोबतच पालिकेच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव करून दिली. तसेच तुम्ही वास्तववादी अर्थसंकल्प दिल्याशिवाय मी काहीही करूशकत नाही, अशी हतबलता व्यक्त करीत विकासकामांच्या प्रश्नाचा चेंडू पुन्हा स्थायी समितीच्याच कोर्टात टोलविला.
मनपाच्या स्थायी समितीची बैठक सोमवारी सभापती दिलीप थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या गैरहजेरीत झालेली ही बैठक वादळी ठरली.
निवडणूक होऊन आठ महिने झाले तरी वॉर्डात एकही काम न झाल्याबद्दल सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, तर भाजपच्या कमल नरोटे यांनी रस्त्याचे काम होत नसल्याच्या निषेधार्थ राजीनाम्याचा इशारा देत सभात्याग केला. बाहेरगावाहून सकाळीच परतल्यानंतर केंद्रेकर यांनी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध बैठकीचा वृत्तांत पाहिला.
प्रशासनाविषयी सदस्यांच्या मनात तीव्र नाराजी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने स्थायी समिती सदस्यांना निरोप पाठविले. दुपारी १२ वाजता सभापती दिलीप थोरात यांच्या उपस्थितीत त्यांनी तब्बल दोन तास सर्व सदस्यांची बैठक घेतली.
या बैठकीतही मकरंद कुलकर्णी, मोहन मेघावाले, कमल नरोटे, नितीन चित्ते, नाईकवाडी, विकास एडके, समिना शेख अशा सर्वच सदस्यांनी आयुक्तांपुढे तक्रारींचा पाढा वाचला. ८ महिन्यांपासून बैठकीत घसा कोरडा पडेपर्यंत ओरडत आहोत, पण एकही काम होत नाही, मग आम्ही जनतेला तोंड कसे दाखवायचे असा संतप्त सवाल या सदस्यांनी उपस्थित केला. तसेच प्रलंबित कामांची यादीच वाचून दाखविली.
वॉर्डातील ड्रेनेज दुरुस्ती, रस्त्यांचे पॅचवर्क यांसारख्या लहान सहान कामांनाही प्रशासनाकडून टोलवाटोलवी केली जात आहे, असा आरोपही यावेळी सदस्यांनी केला. त्यावर आयुक्तांनी आधी पालिकेच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव करून दिली. तरीही सदस्यांच्या भावना तीव्र होत्या. त्या लक्षात घेऊन शेवटी केंद्रेकर यांनी सर्व सदस्यांची दोन दोन कामे करून देण्याचे आश्वासन दिले. तुम्ही तुमच्या वॉर्डातील महत्त्वाच्या एक एक, दोन दोन कामांच्या याद्या माझ्याकडे द्या, त्या करून देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सदस्यांचा विरोध काहीसा मावळला.

Web Title: Two works in angry ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.