औरंगाबादमध्ये दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावले

By Admin | Updated: June 23, 2016 12:29 IST2016-06-23T12:26:56+5:302016-06-23T12:29:20+5:30

औरंगाबादमध्ये सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ सुरू असून दोन महिलांचे दागिने हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला.

Two women's mangulasutra in Aurangabad | औरंगाबादमध्ये दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावले

औरंगाबादमध्ये दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावले

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २३ - औरंगाबादमध्ये मंगळसूत्र चोरीच्या घटनामध्ये  दिवसेंदिवस वाढ होत आहे. गारखेडा परिसरातील व्यंकटेशनगर येथे एका वृद्ध महिलेची अडीच तोळ्याची सोनसाखळी तर सिडको एन-३ येथे दुस-या एका महिलेचे पाच तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. या दोन्ही घटना गुरूवारी सकाळी ८ ते ८.४० वाजेच्या दरम्यान घडल्या.
 
( मोबाईल चोर निघाले सोनसाखळी चोर)
 
 
पुण्यातही चोरटयांनी लांबवला दोन महिलांचा ऐवज
दरम्यान पुण्यातही सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ सुरू असून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांचा 1 लाख 31 हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळवला. याप्रकरणी सिंहगड रोड आणि निगडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. सिंहगड रस्त्यावरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील 60 हजारांचे मंगळसूत्र तर निगडीमधील महिलेच्या गळ्यातील 71 हजारांचे गंठण हिसकावण्यात आले आहे.

Web Title: Two women's mangulasutra in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.