अपघातात दोन महिला जागीच ठार

By Admin | Updated: May 25, 2014 01:31 IST2014-05-25T01:21:34+5:302014-05-25T01:31:29+5:30

गंगापूर : गंगापूर ते जुने कायगाव मार्गावर स्मशानभूमीजवळ रस्ता कामासाठी खोदलेल्या साईड पट्ट्याच्या खड्ड्यात काळी-पिवळी जीप पलटी झाल्याने दोन महिला जागीच ठार झाल्या

Two women were killed in the accident | अपघातात दोन महिला जागीच ठार

अपघातात दोन महिला जागीच ठार

 गंगापूर : गंगापूर ते जुने कायगाव मार्गावर स्मशानभूमीजवळ रस्ता कामासाठी खोदलेल्या साईड पट्ट्याच्या खड्ड्यात काळी-पिवळी जीप पलटी झाल्याने दोन महिला जागीच ठार झाल्या, तर पाच वर्षाच्या मुलीसह दोन महिला गंभीर जखमी झाल्या. हा अपघात शनिवारी सायंकाळी ६ वाजता घडला. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग केल्यामुळे सदर अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती. शनिवार हा गंगापूरचा आठवडी बाजारचा दिवस असल्याने या मार्गावर मोठी गर्दी होती. नगर जिल्ह्यातील शेवगाव व नेवासा तालुक्यांतील मंडळी येवला तालुक्यातील अंदरसूल येथे नातेवाइकांकडील लग्न समारंभ आटोपून परतत असताना ते गंगापूर येथे आले. तेथून एमएच-१७ के-८१५७ या काळी-पिवळी जीपमध्ये बसून गावाकडे जात असताना शहरापासून २ कि.मी. अंतरावर हा अपघात घडला. या अपघातात सिंधूबाई बबन राऊत (५०, रा. भातकुडगाव, ता. शेवगाव), मनीषा संदीप आरडे (४०, रा. प्रवरा संगम, ता. नेवासा) या महिला जागीच ठार झाल्या. गंगू मच्छिंद्र गवळी (३०), केशरबाई नाना रोकडे (६०), कार्तिकी चंद्रकांत (५) या तिघी गंभीर जखमी झाल्या. गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून जखमींना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. (वार्ताहर)शनिवारी आठवडी बाजार असल्याने ग्रामीण भागातील नागरिक मिळेल त्या वाहनाने शहरात येतात. दुपारनंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी होते आणि ते अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यासाठी धडपड करतात. यातून अवैध वाहने व पोलिसांच्या गाडीचा पाठशिवणीचा खेळ सुरू होतो. आजचा हा अपघात यातूनच झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गेल्या चार महिन्यांपासून या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.

Web Title: Two women were killed in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.