दुचाकीचोर पोलिसांच्या ताब्यात, ३ दुचाकी जप्त

By Admin | Updated: June 30, 2017 00:04 IST2017-06-30T00:01:16+5:302017-06-30T00:04:45+5:30

जालना : नाशिक जिल्ह्यात दुचाकींची चोरी करून ती परतूर तालुक्यात विक्री करणाऱ्या चोरट्यास विशेष कृती दलाच्या पथकाने गुरूवारी दुपारी ताब्यात घेतले.

Two wheelers seized in the possession of two-wheeler police | दुचाकीचोर पोलिसांच्या ताब्यात, ३ दुचाकी जप्त

दुचाकीचोर पोलिसांच्या ताब्यात, ३ दुचाकी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नाशिक जिल्ह्यात दुचाकींची चोरी करून ती परतूर तालुक्यात विक्री करणाऱ्या चोरट्यास विशेष कृती दलाच्या पथकाने गुरूवारी दुपारी ताब्यात घेतले. संशयित राहुल कारभारी डुकरे याच्याकडून चोरीच्या ९० हजार रूपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
परतूर तालुक्यातील बाबूलतारा येथे राहुल कारभारी डुकरे (२०) हा चोरीची दुचाकी विक्रीच्या प्रयत्नात होता. याची माहिती सपोनि किशोर पवार यांना मिळताच पथकाने बाबूलतारा येथे पोहचून राहुल याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत राहुल याने नाशिक येथून दोन मोटर सायकल चोरून आणल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून सर्व दुचाकी जप्त करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. राहुल डुकरेचा हल्ली मुक्काम नाशिक येथे असून, तेथून दुचाकींची चोरी करून गावाकडे विक्री करत असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राजेंद्र सिंह गौर, यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किशोर पवार, एम.बी. स्कॉट, रामप्रसाद रंगे, मारोती शिवरकर, फुलचंद हजारे, सुभाष पवार, नंदकिशोर कामे, किरण चव्हाण, विजय वाघमारे यांनी केली.

Web Title: Two wheelers seized in the possession of two-wheeler police