औरंगाबादमध्ये महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त दुचाकी रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 15:42 IST2018-04-18T15:40:03+5:302018-04-18T15:42:19+5:30

जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दुचाकी रॅली काढण्यात अली. यावेळी रॅलीत फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथात अक्कमा देवी आणि महात्मा बसवेश्वरांची वेशभूषा साकारलेल्या बालकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

Two-wheeler rally in Aurangabad for Mahatma Basaveshwar Jayanti | औरंगाबादमध्ये महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त दुचाकी रॅली

औरंगाबादमध्ये महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त दुचाकी रॅली

औरंगाबाद : जगतज्योती  महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दुचाकी रॅली काढण्यात अली. यावेळी रॅलीत फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथात अक्कमा देवी आणि महात्मा बसवेश्वरांची वेशभूषा साकारलेल्या बालकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

जगत््ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती जिल्हा उत्सव समितीतर्फे सकाळी महात्मा बसवेश्वर चौक (आकाशवाणी) येथे महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आ. अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेता विकास जैन, सभापती गजानन बारवाल, नगरसेवक राजू वैद्य, मकरंद कुलकर्णी, सचिन खैरे, ऋषीकेश खैरे, किशोर नागरे, नगरसेविका शोभा बुरांडे, शिल्पाराणी वाडकर, शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, उद्योजक बसवराज मंगरुळे, जिल्हा उत्सव समितीचे अध्यक्ष विरभद्र गादगे, ज्ञानेश्वरअप्पा खर्डे यांची उपस्थिती होती.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर दुचाकी रॅली काढण्यात आली.  महात्मा बसवेश्वरांचा जयघोष, दुचाकींना लावलेल्या ध्वज अशा वातावरणात ही रॅली रवाना झाली. यामध्ये युवकांसह युवतींचा मोठा सहभाग होता. क्रांतीचौक, संत एकनाथ रंगमंदिर, ज्योतीनगर, चेतक घोडा, त्रिमूर्ती चौक, पुंडलिकनगर, जयभवानीनगर, सिडको बसस्थानक, कॅनॉट प्लेस, बजरंग चौकमार्गे टीव्ही सेंटर येथील स्वामी विवेकानंद उद्यानातील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर रॅलीचा समारोप झाला.

Web Title: Two-wheeler rally in Aurangabad for Mahatma Basaveshwar Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.