लक्ष्मीनगरातून दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:07 IST2021-02-06T04:07:03+5:302021-02-06T04:07:03+5:30

------------------- सारा व्यंकटेश रोडवरील पथदिवे बंद वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर परिसरातील सारा व्यंकटेश या रोडवरील पथदिवे तीन ...

Two-wheeler lampas from Laxminarayan | लक्ष्मीनगरातून दुचाकी लंपास

लक्ष्मीनगरातून दुचाकी लंपास

-------------------

सारा व्यंकटेश रोडवरील पथदिवे बंद

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर परिसरातील सारा व्यंकटेश या रोडवरील पथदिवे तीन दिवसांपासून बंद आहेत. मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांना अंधारातून ये-जा करावी लागत आहे. या भागातील पथदिवे सुरू करण्याची मागणी त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.

--------------------

पंढरपुरात धुरामुळे प्रदूषण

वाळूज महानगर : पंढरपुरातील कब्रस्तानलगतच्या मोकळ्या भूखंडावरील कचरा पेटविला जात असल्याने सर्वत्र धुराचे लोळ पसरत असून प्रदूषणाचा धोका वाढला आहे. या मोकळ्या भूखंडावर विविध व्यवसायिक व नागरिक केरकचरा आणून टाकतात. यानंतर कचरा पेटविला जात असल्याने सर्वत्र धुराचे लोळ पसरत असून या मार्गावरुन ये-जा करणाऱ्यांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे.

-------------------------------

वैष्णोदेवी उद्यान रोडवर सांडपाणी

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील वैष्णोदेवी उद्यानरोडवरुन सांडपाणी वाहत असून, ठिक-ठिकाणी घाण पाणी साचत आहे. रस्त्यावरुन वाहणाऱ्या या सांडपाण्यामुळे ये-जा करणारे कामगार, भाविक व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.

------------------------------

Web Title: Two-wheeler lampas from Laxminarayan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.