विचित्र अपघातात दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: May 5, 2017 00:15 IST2017-05-05T00:12:21+5:302017-05-05T00:15:13+5:30
भोकरदन : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीचालक ठार झाल्याची घटना गुरूवारी घडली.

विचित्र अपघातात दुचाकीस्वार ठार
भोकरदन : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीचालक ठार झाल्याची घटना गुरूवारी भोकरदन-आन्वा मार्गावर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. सुधाकर पांडूरंग दांडगे (२०, रा. वाघेरा ता. सिल्लोड ) मृताचे नाव आहे.
सुधाकर दांडगे हा दगडवाडी येथून लग्नसमारंभावरून आन्वाकडे येथे दुचाकीने जात होता. आन्वाकडून दीपक रामराव सुरडकर (२८) व ऋषीकेश दीपक सुरडकर हे दोघे भोकरदनकडे जात होते. भोकरदन -आन्वा मार्गावरील जलशुध्दीकरण केंद्राजवळ या दोन्ही दुचाकींची धडक झाली. यात मृत सुधाकर दांडगे हा रस्त्याच्या मधोमध पडला. त्याच दरम्यान रस्त्यावर जात असलेला ट्रक(एम.एच.२० ए. टी. ६६६८) च्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला. तर सुरडकर बापलेक हे गंभीर जखमी झाले. ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.