दुचाकीस्वार जागीच ठार

By Admin | Updated: July 19, 2015 00:57 IST2015-07-19T00:53:01+5:302015-07-19T00:57:50+5:30

भूम : दोन दिवसापूर्वी निधन झालेल्या नातेवाईकाची राख सावडण्यासाठी दुचाकीवरून हाडोंग्रीकडे जात जाताना ट्रकची धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला

Two-wheeler killed on the spot | दुचाकीस्वार जागीच ठार

दुचाकीस्वार जागीच ठार

भूम : दोन दिवसापूर्वी निधन झालेल्या नातेवाईकाची राख सावडण्यासाठी दुचाकीवरून हाडोंग्रीकडे जात जाताना ट्रकची धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान तालुक्यातील हाडोंग्री येथील पुलावर घडली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, भूम येथील आश्रुबा बाबासाहेब गाढवे (वय ४५) हे सकाळी भूम येथून हाडोंग्रीकडे जात होते. हाडोंग्री गावाजवळ असणाऱ्या पुलावरच्या कॉर्नरला हैद्राबादकडून नगरकडे जाणाऱ्या ट्रक (क्र. ए.पी.२१/डब्ल्यु. ४४७७) व या मोटार सायकलचा अपघात झाला. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघात होताच नातेवाईक व पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी सुभाष भिमराव गाढवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रक चालक के.व्यंकटेश के वेरलु (रा. कर्नुल, आंध्रप्रदेश) याच्याविरूध्द भादंवि कलम २७९, ३३८,३०४ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोउपनि आर. पी. घुले करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Two-wheeler killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.