दोन दुचाकीचोर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2017 00:36 IST2017-05-27T00:34:58+5:302017-05-27T00:36:57+5:30

येरमाळा : येरमाळा पोलिसांनीही दोन दुचाकी चोरांना जेरबंद करून पाच दुचाकी जप्त केल्या़

Two-wheeler jerk | दोन दुचाकीचोर जेरबंद

दोन दुचाकीचोर जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
येरमाळा : येरमाळा पोलिसांनीही दोन दुचाकी चोरांना जेरबंद करून पाच दुचाकी जप्त केल्या़ ही कारवाई शुक्रवारी सकाळी कळंब तालुक्यातील कडकनाथवाडी शिवारात करण्यात आली़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील कडकनाथवाडी शिवारातील डोंगरपरिसरात पाच दुचाकी लपवून ठेवल्याची माहिती येरमाळा पोलिसांना मिळाली होती़ अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी काटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विनोद चव्हाण यांच्यासह त्यांचे सहकारी जाधव, कांबळे, करीम शेख यांनी शुक्रवारी सकाळी कडकनाथवाडी शिवारात धडक कारवाई केली़ या कारवाईत रामेश्वर अर्जुन जाधवर व एका अल्पवयीन मुलाला जेरबंद केले असून, पाच दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत़ या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, पकडण्यात आलेल्या पाच पैकी एक दुचाकी येरमाळा येथील व एक येडशी येथील असल्याचे समोर आले आहे़

Web Title: Two-wheeler jerk