सिडको एम २ येथे दुचाकी पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:21 IST2021-02-05T04:21:06+5:302021-02-05T04:21:06+5:30
=================== घरासमोर गांजा पिण्यास विरोध केल्याने मारहाण औरंगाबाद : घरासमोर गांजा पिण्यास विरोध केल्यामुळे अशोक सखाराम मुळे यांना चार ...

सिडको एम २ येथे दुचाकी पळविली
===================
घरासमोर गांजा पिण्यास विरोध केल्याने मारहाण
औरंगाबाद : घरासमोर गांजा पिण्यास विरोध केल्यामुळे अशोक सखाराम मुळे यांना चार जणांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना २४ जानेवारी रोजी रात्री मिसारवाडी येथे झाली. मुळे यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. अज्जू गफूर शहा, समद गफूर शहा, अरबाज अशी आरोपींची नावे आहेत.
============(((==((======
प्रोझोन मॉलच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी
औरंगाबाद : प्रोझोन मॉलच्या वाहनतळावर उभी असलेली मोटारसायकल (एमएच २०- एफटी ४८२८) चोरट्यांनी लंपास केली. २४ जानेवारी रोजी झालेल्या या घटनेविषयी निखिल संजय रगडे यांनी एमआयडीसी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली.
========
चाकू बाळगणारा पकडला
औरंगाबाद : खुलेआम चाकू बाळगून दहशत निर्माण करणारा आरोपी भास्कर बाबूराव गायकवाड (रा. शिवाजीनगर) याला सातारा पोलिसांनी अटक केली. पोलीस कॉंस्टेबल विष्णू कारभारी ढाकणे यांनी सरकारतर्फे आरोपीवर सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविला.
================