ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू
By Admin | Updated: May 16, 2016 23:44 IST2016-05-16T23:43:34+5:302016-05-16T23:44:59+5:30
अहमदपूर : शहरातील काळेगाव रोडवर एका ट्रकखाली दुचाकीस्वार चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.

ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू
अहमदपूर : शहरातील काळेगाव रोडवर एका ट्रकखाली दुचाकीस्वार चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.
मुजिब अमिरोद्दीन जाफरी (वय ३८, दस्तगीर गल्ली, अहमदपूर) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. मुजिब जाफरी हे सोमवारी सकाळी काळेगाव रस्त्यावरील महेबुब नगर येथे सुरू असलेल्या आपल्या बांधकामावर दुचाकी (एमएच २४ एडी ५०४६) वरून जात होते. ते काळेगाव रोडवरील पोकर्णा यांच्या घराजवळ पोहोचले असता समोरून विटा भरून आलेल्या भरधाव वेगातील ट्रकने (एमएच १२ सीटी १८०२) धडक दिली. या अपघातात मुजिब जाफरी यांचा ट्रकच्या पाठीमागील टायरखाली चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अहमदपूर पोलिसात गुन्हा दाखल असून, ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. (वार्ताहर)