कारच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू
By Admin | Updated: September 26, 2014 00:43 IST2014-09-26T00:39:38+5:302014-09-26T00:43:56+5:30
नांदेड: भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील नारायण उर्फ पप्पू गणेश देशमुख (वय ४०, रा़ गणेशनगर नांदेड ) यांचा मृत्यू झाला़

कारच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू
नांदेड: भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील नारायण उर्फ पप्पू गणेश देशमुख (वय ४०, रा़ गणेशनगर नांदेड ) यांचा मृत्यू झाला़ ही घटना बुधवारी मध्यरात्री १२़३० वाजेच्या सुमारास शहरातील स्रेहनगर पोलिस वसाहतीसमोर घडली़
नारायण देशमुख हे दुचाकी क्रमांक एम़ एच़ २६ एऩ ५६२९ वर वर्कशॉप ते आयटीआय रस्त्याने घराकडे जात होते़ दरम्यान, मागून आलेल्या इंडिका व्हिस्टा एम़ एच़ २६ ए़ के़ २१३८ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून दुचाकीला जोराची धडक दिली़
अपघातात गंभीर जखमी झालेल्या नारायण देशमुख यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला़ याप्रकरणी उदयकुमार गुंजकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कार चालकाविरुद्ध भाग्यनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला़ तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील हे करीत आहेत़
नारायण पाटील यांच्या पार्थिवावर गोवर्धनघाट येथील शांतीधाम स्मशानभूमीत गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील असा परिवार आहे़ (प्रतिनिधी)