शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कचरा टाकण्याच्या क्षुल्लक वादातून दोघांना भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 15:11 IST

दोघांचीही प्रकृती गंभीर असून रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशहरातील रहेमानिया कॉलनीतील घटना 

औरंगाबाद : कचरा टाकल्याच्या कारणावरून महिलेसह दोघांना आठ जणांनी लाथाबुक्या तसेच लाकडी दांड्याने गंभीर मारहाण केली. आरोपींनी पोटात चाकू भोसकून दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजेदरम्यान रहेमानिया कॉलनीत घडली. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध जिन्सी पोलीस घेत आहेत. 

फईमुद्दीन शेख (३०), शेख नईम (रा. रहेमानिया कॉलनी, गल्ली नं. १२), अशी जखमींची  नावे आहेत. कचरा टाकण्याच्या किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले.  शेख फईमुद्दीन व शेख नईम यास शेख सय्यद महेमूद सय्यद अमीर (५०), सय्यद अमीर सय्यद महेमूद (२९), सय्यद जावेद सय्याद महेमूद (२६), इम्रान (२७) व अन्य चार महिला, अशा आठ जणांनी मिळून  शेख परवीन फईमुद्दीन, तिचा पती आणि दिराला लाकडी दांड्याने गंभीर मारहाण केली. रागाच्या भरात फईमुद्दीन व नईम या दोघांच्या पोटावर चाकूने वार केले. दोघांनाही जखमी अवस्थेत शासकीय दवाखान्यात नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांनी दाखल केले. 

दोघांचीही प्रकृती गंभीर असून, याप्रकरणी शेख परवीन फईमुद्दीन यांच्या तक्रारीवरून रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्यांना अटक करण्यात आली असून, जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ गिते अधिक तपास करीत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस