दोन आठवड्यांत तक्रारी निकाली काढून अहवाल पाठविण्याचे आदेश
By Admin | Updated: July 23, 2016 00:58 IST2016-07-23T00:39:53+5:302016-07-23T00:58:24+5:30
लातूर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी शुक्रवारी लातुरात महिलांच्या तक्रारींसंबंधी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.

दोन आठवड्यांत तक्रारी निकाली काढून अहवाल पाठविण्याचे आदेश
लातूर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी शुक्रवारी लातुरात महिलांच्या तक्रारींसंबंधी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी सुनावणी झालेल्या १५ तक्रारींचा निपटारा करून १५ दिवसांत राज्य महिला आयोगाकडे अहवाल पाठवावा, असे आदेश रहाटकर यांनी दिले.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी ए.बी. गव्हाणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.एच. निपाणीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान, पोलिस उपनिरीक्षक वर्षा दंडिमे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रहाटकर यांनी जिल्ह्यातील महिला अत्याचार आणि तक्रारींची पोलीस प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर विश्रामगृहात राज्य महिला आयोगाची विशेष बैठक झाली. सुनावणीदरम्यान तक्रारदार महिलांनी आयोगाच्या अध्यक्षांसमोर आपल्या अडचणी आणि म्हणणे मांडले.