परळीत डेंग्यूचे दोन बळी
By Admin | Updated: October 31, 2014 00:36 IST2014-10-31T00:10:25+5:302014-10-31T00:36:06+5:30
संजय खाकरे , परळी शहरात तसेच ग्रामणी भागात मागील अनेक महिन्यांपासून साधी धूर फवारणी देखील झालेली नाही. यामुळे डेग्यु, चिकुन गुन्या या आजारांचे थैमान तालुक्यातील काही गावात

परळीत डेंग्यूचे दोन बळी
संजय खाकरे , परळी
शहरात तसेच ग्रामणी भागात मागील अनेक महिन्यांपासून साधी धूर फवारणी देखील झालेली नाही. यामुळे डेग्यु, चिकुन गुन्या या आजारांचे थैमान तालुक्यातील काही गावात व शहरी भागात आले आहे. यामध्ये शहरी भागातील मलिकपुरा भागातील दोन बालकांना डेग्युची लागण होऊन मृत्यू झाला.
परळी नगर पालिकेने एक ते दिड महिन्यापुर्वी शहरातील सर्व भागात स्वच्छता केली असती तर मलिकपुरा भागातील दोन बालकांना डेग्युमुळे आपला जीव गमवावा लागला नसता. अशा प्रतिक्रीया परळी शहरातील नागरिकांनी दिल्या आहेत. डेग्यु व चिकुन गुन्याने शहर व ग्रामीण भागात आपले पाय पसरविण्यास सुरूवात केल्या नंतर परळी न. प. ला स्वच्छतेची आठवण झाली असून मागील पाच सहा दिवसापासून स्वच्छतेचे काम हाती घेतले असल्याचे परळीचे नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी सांगितले.
परळी तालुक्यातील २४ पदे रिक्त
परळी तालुक्यातील सिरसाळा व धर्मापुरी या ठिकाणी मागील अनेक महिन्यांपासून वैद्यकीय नसल्याने या भागात आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. आरोग्य सेवकाचे एकूण २१ पदे मंजूर आहेत. २१ पैकी १७ पदे रिक्त आसून केवळ चारच आरोग्य सेवक कार्यरत आहेत.
याशिवाय आरोग्य सेविकांचे २४ पदे मंजूर असून ५ पदे रिक्त आहेत. तालुक्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.