माळीवाड्यात दोन ट्रकची समोरासमोर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:09 IST2021-01-08T04:09:21+5:302021-01-08T04:09:21+5:30

दौलताबाद : माळीवाडा गावाजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. एमएच ०४ ...

Two trucks collided head-on in Maliwada | माळीवाड्यात दोन ट्रकची समोरासमोर धडक

माळीवाड्यात दोन ट्रकची समोरासमोर धडक

दौलताबाद : माळीवाडा गावाजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

एमएच ०४ एफडी १६८३ हा ट्रक पैठणवरून गुजरातमधील अंकलेश्वरकडे पेपर घेऊन जात होता, तर जीजे ३२ टी ९९१० हा ट्रक गुजरातवरून औरंगाबादकडे येत होता. दोन्ही ट्रक माळीवाडा गावाजवळ येताच त्यांच्यात समोरासमोर टक्कर झाली. यात गुजरातवरून आलेल्या ट्रकचा चालक कॉबिनमध्ये पूर्णपणे दबला होता.

अपघाताची माहिती मिळताच माळीवाडा गावातील लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. कॉबिनच्या काचा फोडून काही लोकांनी तर कॉबिनच्या दुसऱ्या बाजूने चालकाला बाहेर काढण्यात आले. यात ट्रकचालक शेख आरिफ शेख समद (५२) जखमी झाले होते. कोणतीही प्रतीक्षा न करता माळीवाडा येथील कडू कीर्तीकर यांच्या कारमध्ये जखमी चालकाला टाकून उपचारासाठी औरंगाबादला पाठविण्यात आले. यावेळी नवनाथ आढाव, जगन्नाथ भगत, प्रमोद साठे, नितीन वानखेडे, चंद्रकांत हेकडे, नवनाथ हेकडे, धनंजय शेरकर, आसिफ बगदार, पप्पू पवार यांनी मदत केली. अपघातात दोन्ही ट्रकचे नुकसान झाले आहे. त्यानंतर तासाभराने दौलताबाद पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत या घटनेची दौलताबाद पोलीस ठाण्यात ‌नोंद झालेली नव्हती.

Web Title: Two trucks collided head-on in Maliwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.