दोन ट्रकची धडक

By Admin | Updated: July 27, 2014 01:15 IST2014-07-27T00:38:26+5:302014-07-27T01:15:04+5:30

तुळजापूर : कांदा घेऊन सोलापूरकडे निघालेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या ट्रकला जोराची धडक दिल्याने दोघे जागीच ठार झाले़

Two Truck Shocks | दोन ट्रकची धडक

दोन ट्रकची धडक

तुळजापूर : कांदा घेऊन सोलापूरकडे निघालेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या ट्रकला जोराची धडक दिल्याने दोघे जागीच ठार झाले़ तर गंभीर जखमी दोघांना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास तुळजापूर घाटात घडली़ दरम्यान, मयत व जखमी हे जळगाव जिल्ह्यातील आहेत़
पोलिसांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील श्रीरंग उत्तमराव सूर्यवंशी (वय-४९), अभिमन्यू निळकंठ साबळे (वय-३५ दोघे रा़ वरखेडे ता़चाळीसगाव) हे शनिवारी सकाळी कांदा भरलेली ट्रक (क्ऱएम़एच़१९- झेड ३८५८) घेवून सोलापूरकडे जात होते़ तुळजापूर येथील घाटात या ट्रकने समोरून येणाऱ्या ट्रकला (क्ऱसी़जी़०८-एम़२२२४) जोराची धडक दिली़ या अपघातात दोन्ही ट्रक ेउलटले. यात श्रीरंग उत्तमराव सूर्यवंशी व चालक अभिमन्यू निळकंठ साबळे यांचा मृत्यू झाला़ तर दुसऱ्या ट्रकमधील भैय्या सोमसिंग कच्छवा (वय-३५), लालसिंग बाबूसिंग कच्छवा (दोघे रा़वाखेडे ता़चाळीसगाव) हे गंभीर जखमी झाले़ या जखमींना उपचारासाठी सोलापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ याप्रकरणी प्रेमसिंग भाऊसिंग पवार (वय-५० रा़वरखेडे ता़चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक अभिमन्यू निळकंठ साबळे (मयत) याच्याविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ तपास सपो उपनि बुआ हे करीत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: Two Truck Shocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.