दोन पथकांनी केली कामाची चौकशी
By Admin | Updated: November 2, 2015 00:16 IST2015-11-02T00:09:10+5:302015-11-02T00:16:13+5:30
कळंब : पंचायत समिती अंतर्गत झालेल्या महाग्रारोहयोच्या कामाच्या चौकशीसाठी रविवारी दोन पथकांनी तालुक्यात ठाण मांडी होती़ गटविकास अधिकारी प्रमुख असलेल्या

दोन पथकांनी केली कामाची चौकशी
कळंब : पंचायत समिती अंतर्गत झालेल्या महाग्रारोहयोच्या कामाच्या चौकशीसाठी रविवारी दोन पथकांनी तालुक्यात ठाण मांडी होती़ गटविकास अधिकारी प्रमुख असलेल्या या पथकाने खामसवाडी व ईटकूर जिल्हा परिषद गटातील ११ गावातील कामांची पाहणी करून चौकशी केली़
जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार पंचायत समिती मार्फत झालेल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामांची तपासणी सुरू करण्यात आली आहे़ यासाठी तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटासाठी गटविकास अधिकारी प्रमुख असलेले सात पथके नियुक्त करण्यात आली आहेत़ बुधवारी यासंबंधित अभिलेखे ताब्यात घेणे, नेमून दिलेल्या गटातील गावांना भेटी देणे याबाबत संबंधित पथकातील कर्मचारी पंचायत समितीत हजेरी लावत होते़ गुरूवारी, शुक्रवारी मोहा, शिराढोण गटातील कामांची तपासणी करण्यात आली़ रविवारी भूम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी़जी़माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खामसवाडी गटातील अनेक कामांची तपासणी केली़
या पथकाने खामसवाडी, नागझरवाडी, शिंगोली, वाघोली, गोविंदपूर, बोरगाव गावांची पाहणी केली़ तर इटकूर गटातील इटकूर, हावरगाव, वाकडी (के़), कोठाळवाडी या चार गावातील कामांची तपासणी करण्यात आली़ दरम्यान, नायगाव, डिकसळ आणि येरमाळा गटातील कामांचीही चौकशी त्वरित करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले़ (वार्ताहर)