एका पदासाठी दोन शिक्षकांना नियुक्त्या
By Admin | Updated: July 3, 2014 00:16 IST2014-07-02T23:16:43+5:302014-07-03T00:16:09+5:30
धारुर: प्राथमिक पदवीधरच्या जागेवर आसरडोह येथील जि़प़ शाळेत एका पदावर दोन शिक्षकांना नियुक्त्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़

एका पदासाठी दोन शिक्षकांना नियुक्त्या
धारुर: प्राथमिक पदवीधरच्या जागेवर आसरडोह येथील जि़प़ शाळेत एका पदावर दोन शिक्षकांना नियुक्त्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़ या प्रकारणात ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याची चर्चा केली जात आहे़
जि़प़ शाळेत पदवीधर शिक्षकाच्या नियुक्त्या करताना अनेक गैरप्रकार झाल्याची चर्चा सर्वत्र होत असताना धारूर तालुक्यात आसरडोह येथील जि़प़प्राथमिक शाळेत एका पदवीधरच्या जागेवर एकाच वेळी दोन शिक्षकाची नियुक्ती करण्याचा प्रकार केला असून मच्छिंद्रनाथ पंडित सोळंके यांना जाक़्ऱ ५१४९ नुसार आसरडोह येथे नियुक्तीचा आदेश दिला़ तर अनिल पांडुरंग सारडा या शिक्षकास जाक़्ऱ ५८४१ नुसार याच शाळेवर नियुक्तीचा आदेश दिला़ या एका जागेवर दोन शिक्षकांची नियुक्ती करण्याचा प्रताप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केला़ या पदावर नंतरचा आदेश असताना अनिल सारडा हे रूजू झाले़ मच्छिंद्र सोळंके यांना त्याच्या इच्छेनुसार येथे नियुक्ती आदेश मिळूनही रूजू होता आले नाही़ त्यांनतर हा प्रकार उघड झाला़ गटशिक्षणाधिकारी व्ही़डीक़ुलकर्णी म्हणाले हा वरिष्ठ कार्यालयाशी संबंधीत विषय आहे़ आपल्याला याबद्दल काहीही माहिती नसल्याचे सांगितले़ या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक करे अंजनडोहचे उपसरपंच प्रकाश सोळंके यांनी केली आहे़ (वार्ताहर)
कारवाई करण्याची मागणी
आसरडोहच्या जि.प. शाळेत एका पदावर दोन शिक्षकांना दिल्या नियुक्त्या
या प्रकरणाला ‘अर्थ’ पूर्ण संबंध असल्याची नागरिकांमध्ये चर्चा
सीईओंच्या अजब कारभाराची चौकशी करण्याची मागणी
संबंधितांवर कारवाई करण्याची होतेय मागणी