दोन संशयितांना घेतले ताब्यात
By Admin | Updated: July 14, 2016 00:57 IST2016-07-14T00:28:25+5:302016-07-14T00:57:08+5:30
भोकरदन : येथील सराफा व्यावसायिक मनोज प्रभाकर दुसाने यांचे घरफोडून साडेसात लाख रुपयांचे सोनेचांदीचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

दोन संशयितांना घेतले ताब्यात
भोकरदन : येथील सराफा व्यावसायिक मनोज प्रभाकर दुसाने यांचे घरफोडून साडेसात लाख रुपयांचे सोनेचांदीचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. या प्रकरणातील अजीम करीम पठाण (भोकरदन) गणपत दिगंबर मोरे (नांजा) दोन संशयितांना मंगळवारी सकाळी दहा वाजता भोकरदन पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दुसाने यांचे घर आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चोरीची घटना घडल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलिस या घरफोडी प्रकरणात लक्ष ठेवून होते.
भोकरदन तालुक्यातील नांजा येथील एकजण सोने विक्रीसाठी आमच्या दुकानात आल्याचे सकाळी दहा वाजेच्या सुमारास सिल्लोड येथे एका सराफा व्यावसायिकाने भोकरदन पोलिसांना फोन केला. यावरून पोलिसांनी गणपत मोरे आणि अजीम पठाण या दोन संशयितांना पोलिसांना चोरी संदार्भात विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले असल्याचे पोलिस उपनिरीक्षक विकास कोकाटे यांनी सांगितले. परंतु अद्यापही चोरी गेलेला मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला नाही. या प्रकरणी तपास सुरू आहे. (वार्ताहर)
तीर्थपुरी : येथील पुरातन लक्ष्मीनारायण मंदिराचा दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतील दानपेटी, चांदीचा टोप व इतर साहित्य असा ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
४मंदिराचे पुजारी ईश्वर टाकसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, मंदिरामध्ये दररोज अनेक लोक झोपत असत. दोन दिवसांपासून पाऊस झाल्याने व मुंगळे निघाल्याने लोक येत नव्हते. याचा फायदा घेऊन मंगळवारी ही चोरी झाल्याचे सांगितले.