शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

महापालिकेच्या नोकर भरतीत एका बाकावर दोघांनी बसून सोडविले पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 14:23 IST

या सगळ्या गोंधळामुळे अनेक उमेदवार मनपाच्या नोकरभरतीवर बहिष्कार टाकून परीक्षा न देताच केंद्रावरून बाहेर पडले.

ठळक मुद्देगोंधळामुळे परीक्षा न देताच अनेक जण पडले बाहेर११ जागांसाठी २ हजार उमेदवारांनी दिली परीक्षा

औरंगाबाद  : औरंगाबाद महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांच्या (स्थापत्य) ११ पदांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत बैठक व्यवस्थेवरून गोंधळ उडाला. एकाच बाकावर दोघांना बसविण्यात आल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेवरच उमेदवारांनी आक्षेप घेतला. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी स्वत: उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोंधळामुळे अनेक उमेदवार मनपाच्या नोकरभरतीवर बहिष्कार टाकून परीक्षा न देताच केंद्रावरून बाहेर पडले.

महापालिकेची १९९४ सालानंतर नोकरभरती झालेली नाही. जवळपास साडेसहाशे पदे रिक्त आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांअभावी महापालिकेवर कामाचा भार वाढत आहे. त्यामुळे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी नोकरभरतीची प्रक्रिया सुरू केली. पहिल्या टप्प्यात कनिष्ठ अभियंत्यांची ११ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ११ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. कोणी अर्ज केले आहेत, हे कळू नये आणि नोकरभरती पारदर्शकपणे होण्यासाठी उमेदवारांना थेट लेखी परीक्षेसाठी कागदपत्रांसह रविवारी सकाळी ११ ते १२ यावेळेत देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयात हजर राहण्याची सूचना करण्यात आली होती. 

राज्यभरातील विविध भागांतून उमेदवार सकाळी ११ ते १२ या वेळेत देवगिरी महाविद्यालयात दाखल झाले. प्रारंभी त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना वर्गात बसविण्यात आले. याठिकाणी वर्गात बसल्यानंतर परीक्षेचे नियोजन पाहून उमेदवारांना धक्काच बसला. याठिकाणचे बाक  अतिशय छोटे होते. एकाच बाकावर दोन जणांना बसविण्यात आले. त्यामुळे उमेदवारांनी बैठक व्यवस्थेवर आक्षेप घेऊन एका बाकावर एकच उमेदवार बसविण्याची मागणी केली. मनपाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी बराच वेळ त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते.यासंदर्भात माहिती मिळताच डॉ. निपुण विनायक यांनी धाव घेऊन उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चर्चा केल्यानंतरही एकाच बाकावर दोघांनी बसून परीक्षा देण्यास उमेदवारांनी नकार दिला. या गोंधळामुळे अशा पद्धतीने परीक्षा देणे नको म्हणून अनेक उमेदवार परीक्षा केंद्रातून बाहेर पडले.

पारदर्शकतेवर शंकागोंधळ होत असलेल्या काही वर्गातील उमेदवारांची अन्य वर्गात बैठक व्यवस्था करण्यात आली. यात बराच वेळ गेला. अखेर दुपारी १.४५ वाजता परीक्षेला सुरुवात झाली. जशी व्यवस्था आहे, तशातच २ हजार ९३ उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षा देऊन  बाहेर पडलेल्या उमेदवारांनी परीक्षेच्या नियोजनाविषयी नाराजी व संताप व्यक्त केला. मनपाचे नियोजन चुकले, परीक्षेच्या पारदर्शकतेवर शंका वाटते. ५ वर्षांपासून भरतीसाठी प्रयत्न करतो, अशा परीक्षा होतील, तर आमचे काय होणार, असा सवाल त्यांनी केला. 

प्रश्न क्रमांक ८७ साठी सर्वांना गुणमनपाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतही घोळ झाल्याचे दिसते. परीक्षेनंतर मनपाने संकेतस्थळावर ‘अन्सर की’ अपलोड केली. यात प्रश्न    क्रमांक ८७ साठी सर्वांना गुण देण्यात येत असल्याची सूचना लिहिण्यात आली होती. 

पुढील नियोजनाचा धडानेमके किती उमेदवार परीक्षा देतील, याचा अंदाज नव्हता. तरीही काही वर्गातच उमेदवारांची गैरसोय झाली. बसण्यावरून काही उमेदवारांचा आक्षेप होता. परंतु परीक्षेत बाजूला बसले तरीही कोणी एकमेकांना काही दाखवीत नसतो. थोडा त्रास झाला असला तरी ९० टक्के यशस्वी ठरलो आहोत. यातून पुढील काळातील नियोजनासंदर्भातही एकप्रकारे शिकता आले. सोमवारपर्यंत उमेदवारांची निवड जाहीर करण्याचा प्रयत्न आहे.- डॉ. निपुण विनायक, आयुक्त मनपा

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाexamपरीक्षाStudentविद्यार्थी